Pratap Singh Rane Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election: प्रतापसिंग राणे करणार सुनेविरुद्ध प्रचार

राणे यांची सून दिव्या राणे पर्ये मतदारसंघात भाजपा (BJP) उमेदवार म्हणून यापूर्वीच जाहीर झालेल्या आहेत.

Raju Nayak

पणजी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, ज्यांनी गेला पंधरवडा पर्ये मतदारसंघातील उमेदवारीवरून आपले पुत्र विश्वजित राणे यांच्याविरोधात तीव्र संघर्ष केला ते प्रतापसिंग राणे पर्ये मतदारसंघात काँग्रेस प्रचाराची धुरा वाहणार आहेत. ‘राजकारणातून कोण निवृत्त होत नसतो. मी पर्ये मतदारसंघातील निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती स्वीकारली असली तरी काँग्रेस तत्त्वांशी मी बांधील आहे आणि मी पर्ये मतदारसंघात कॉंग्रेसचा प्रचार करीन’, असे त्यांनी रोखठोक प्रतिपादन केले. राणे यांची सून दिव्या राणे पर्ये मतदारसंघात भाजपा (BJP) उमेदवार म्हणून यापूर्वीच जाहीर झालेल्या आहेत. (Pratap Singh Rane Goa Election)

राणे यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त त्यांना साखळी येथील निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी काल (शुक्रवारी) दिवसभर पाठिराख्यांची गर्दी उसळली होती. नागरिकांच्या स्वागतासाठी राणे यांच्या पत्नी विजयादेवी, कन्या विश्वधारा डहाणूकर जातीने उपस्थित होत्या. या सर्व वाढदिवस सोहळ्याला गेले 15 दिवस सुपूत्र विश्वजित राणे यांच्याबरोबर झालेल्या संघर्षाची किनार होती. झाल्या प्रकाराबद्दल प्रतापसिंग राणे यांनी स्पष्ट भूमिका घेतली. परंतु, विजयादेवी आणि कन्या विश्वधारा खूपच उद्विग्न होत्या. विजयादेवी ''गोमन्तक''शी बोलताना म्हणाल्या, मला राजकारणात प्रत्यक्ष उतरायची कधीही इच्छा नव्हती. मी राजकारणातील अनेक चढ-उतार पाहिले आहेत आणि अनेकपदे भूषविले आहेत. नव्याने राजकारणात उतरायची मला इच्छा नाही. आणि मी कधीही तसे प्रयत्न केले नाहीत.

''गोमन्तक''ला विशेष मुलाखत देताना प्रतापसिंग राणे म्हणाले, मी कॉंग्रेस (Congress) तत्त्वांशी बांधील आहे आणि माझ्या नावाचा कुणी वापर करून जर तो स्वार्थी राजकीय इप्सीत साध्य करण्यासाठी वापरला जात असेल तर ते मी कदापी सहन करणार नाही. कॉंग्रेस पक्ष सर्वसमावेशक राहिला आहे. त्या पक्षाने जात-धर्मावरून कधी भेदभाव केला नाही आणि मने तोडण्याचे कृत्यही कधी केले नाही. मी मुख्यमंत्री असताना इंदिरा गांधी, राहुल तसेच सोनिया गांधी यांच्याबरोबर काम केले. गांधी कुटुंबातील तरुण पिढीशी माझा संपर्क आला आहे आणि सध्याच्या कॉंग्रेसच्या वाताहातीबद्दल मी त्यांना दोष द्यायला तयार नाही. गांधी कुटुंबातील तरुण पिढी अजूनही काँग्रेस नितीमूल्यांना धरून आहे. या पार्श्वभूमीवर राणे कुटुंबाची दुसरी पिढी भाजपला कशी निकट जाऊ शकते या प्रश्नावर राणे म्हणाले, मी कुणावर कधी बंधन आणले नाही. आणि पुत्रालाही कधी त्याच्या राजकीय निर्णयांपासून रोखले नाही. विश्वजित राणे यांच्यावर नियंत्रणे लादण्याची माझी कधीही भूमिका राहिली नाही. तो स्वतःचे निर्णय घ्यायला समर्थ आहे. परंतु माझ्या निर्णयांवरही मी कुणाला हस्तक्षेप करू देणार नाही. काँग्रेस पक्षाशी मी यापुढेही निगडीत राहीन. एवढेच नव्हे, तर मला या पक्षाने प्रचारात सामील करून घेतले तर मी त्यात जरूर सहभागी होईन. निवडणुकीच्या (Election) राजकारणाव्यतिरिक्तही राजकारण करण्यासारखी अनेक कामे असतात. शिवाय संसदीय राजकारणही मला खुले आहे.’

कोणताही शब्द दिला नाही

‘मला भेटायला भाजपचे काही नेते घरी आले. त्यांचे मी योग्य आदरातिथ्य केले. घरात येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही आदराने वागवू. परंतु मी राजकारणातून निवृत्त होणार आहे, असा कोणताही शब्द मी त्यांना दिला नव्हता. जेव्हा त्यांनी परस्पर तसे विधान केले, तेव्हा मला आश्चर्य वाटले. त्याचे जाहीरपणे खंडन करणे मला भाग होते, असे राणे म्हणाले.

विरोधक कुणीही असो...

राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये पर्येचे काँग्रेस उमेदवार रणजीत राणे यांचा समावेश होता. रणजीत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राणेंना शुभेच्छा देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला तेव्हा आपण पर्ये मतदारसंघात रणजीत यांना पाठिंबा देऊ आणि त्यांच्या प्रचारातही भाग घेऊ, असे वचन ज्येष्ठ राणे यांनी त्यांना दिले. ते म्हणाले, रणजीत हे या मतदारसंघाचे पहिले आमदार जयसिंगराव राणे (1963) यांचे सुपुत्र आहेत आणि मीच त्यांचे नाव काँग्रेसला सुचवले, असे सांगून ‘रणजीत यांच्या प्रचारात मी भाग घेईन. त्यांच्या विरोधात कोणीही असले तरी मला त्याची पर्वा नाही’, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT