Goa Congress Leader Elvis Gomes Dainik Gomantak
गोवा निवडणूक

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी 'एल्विस गोम्स' यांना गोवा पोलिसांनी घेतले ताब्यात

काँग्रेसच्या दहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: पणजी मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार एल्विस गोम्स तसेच काँग्रेसचे गोव्याचे मुख्य निवडणूक निरीक्षक पी चिदंबरम (P. Chidambaram) यांच्यासह अनेक कॉंग्रेस नेते व कार्यकर्ते प्रचार करत पणजीत पदयात्रा काढत आहेत. (Goa congress leader Elvis Gomes was arrested for violating the code of conduct)

म्हणून, आचारसंहितेचा (Code of Conduct) भंग केल्याप्रकरणी पणजी निर्वाचन अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. घरोघरी प्रचार करण्यास फक्त वीस जणांना परवानगी आहे. मात्र या प्रचारात 35 हून अधिक काँग्रेस (Goa Congress) कार्यकर्ते सामील झाले होते. या तक्रारीच्या आधारे पणजी पोलिसांनी (Goa Police) काँग्रेसचे उमेदवार एल्विस गोम्स यांच्यासह सुमारे दहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे व त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांविरुद्ध गुन्हा दाखल

निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी विविध राजकीय पक्षांच्या चार उमेदवारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित उमेदवारांना बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीला उत्तर न दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याची प्रत मुख्य निवडणूक कार्यालयालाही पाठवण्यात आली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी मंत्री मायकल लोबोंसह तीन काँग्रेसचे आणि एका भाजप उमेदवाराचा समावेश आहे.

निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष व उमेदवारांना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर सभा घेण्यास तसेच घरोघरी प्रचार करताना पाचपेक्षा अधिक लोकांना सोबत घेऊन प्रचारास मनाई केली आहे. कोरोनासारख्या महामारीचा प्रसार रोखण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 144 जारी केले आहे. कळंगुटचे काँग्रेस उमेदवार मायकल लोबो (Michael Lobo) तसेच साळगाव येथील काँग्रेसचे केदार नाईक हे घरोघरी प्रचार करताना मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व समर्थक त्यांच्यासोबत फिरत असल्याची तक्रार म्हापसा येथील भरारी पथकाकडे आली होती.

काँग्रेसच्या या उमेदवारांवर गुन्हा नोंद

म्हापशाचे भाजपचे (BJP) उमेदवार जोशुआ डिसोझा तसेच काँग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर, शिवोलीत दिलायला लोबो, तसेच पेट्रिक सावियो आल्मेदा यांनीही निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Court: मतिमंद युवतीवर गेस्ट हाऊसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार; शाहजाद शेखचा जामीन फेटाळला

गोव्याला स्वच्छतेचा दुहेरी मान! पणजीसह साखळीला थेट दिल्लीत पुरस्कार; आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Goa Tourism: महिला, लहान मुलांच्या सुरक्षेत हयगय कराल तर खबरदार...; सरकारची हॉटेल्सना सक्त सूचना

Goa Live News: "पाली शिवलिंग धबधब्यावर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध" आमदार डॉ. देविया राणे

Basketball World Championship: गोव्याचा जेशुआ भारताच्या प्रतिनिधित्वासाठी सज्ज, 19 जूलैपासून रंगणार जागतिक विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धा

SCROLL FOR NEXT