BJP Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Assembly Election: पणजी ताळगावात भाजपचीच सरशी

मोन्सेरात: तिसवाडीतील सर्व जागा जिंकणार

दैनिक गोमन्तक

पणजी: कधी नव्हे ते पणजी व ताळगाव मतदारसंघात बाबुश मोन्सेरात यांना मोठ्या आव्हानाला सामोरे जाण्याची वेळ या निवडणुकीत आली आहे. मतदान संपल्यानंतर बाबुश मोन्सेरात यांनी या दोन्ही मतदारसंघात भाजपचीच सरशी होणार आहे असा दावा केला. तिसवाडी तालुक्यातील पाचही मतदारसंघात भाजपचेच (BJP) उमेदवार निवडून येतील असे मतही त्यांनी मतदानाचा आढावा घेतल्यानंतर व्यक्त केले.

मागील 2017 ची सर्वसाधारण निवडणूक तसेच 2019 च्या पोटनिवडणुकीपेक्षा यावेळी मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मतदानामध्ये झालेली वाढ आपल्यासाठी सकारात्मक असून त्यामध्ये भाजपविरोधी मते असे काही नाही. ज्या तऱ्हेने पणजीमध्ये (Panaji) मतदान झाले आहे त्याबाबत मी समाधानी आहे. मतदानाची अधिक टक्केवारी ती मलाच फायदेशीर आहे. टक्केवारी वाढली तर धोका असतो असे काही नाही.

जर तुम्ही लोकांची कामे केली असल्याने मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करतात व पणजीत तेच घडले आहे. माझ्या नगरसेवकांनी गेले दहा महिने पणजीत केलेल्या कामामुळे लोकांनी माझ्या बाजूनेच कल दिला आहे यावर विश्‍वास आहे, असे मोन्सेरात म्हणाले.

ताळगावमध्ये माझी पत्नी जेनिफर मोन्सेरात (Jennifer Monserrat) या भाजपतर्फे निवडणूक लढवत आहेत. ताळगावात त्यांना मतदारांनी कौल दिला आहे यात काहीच दुमत नाही.

पणजीतून मीसुद्धा निवडून येणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे ताळगाव व पणजी हे दोन्ही मतदारसंघ भाजपला निवडून देण्याचे काम आम्ही केले आहे. तिसवाडीतील सर्व मतदारसंघात भाजपचेच उमेदवार विजयी होणार आहे असा दावा यापूर्वी मी केला होता व त्याच्याशी कायम आहे. या सर्व मतदारसंघात मी प्रचार करून भाजपच्या उमेदवारांना निवडून आणू असे म्हटले नव्हते. इतर तीन मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी होण्याइतपत सक्षम आहेत. त्यांची मतदारसंघावर पकड आहे. त्यामुळे मतदार त्यांना बहुसंख्येने विजयी करतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: "हुकमी पदकविजेती, पण खिशात पैसे नाहीत!" साक्षी काळेची धाव आता आर्थिक अडचणींच्या ट्रॅकवर; आशियाई पॅरा गेम्समधील सहभागही टांगणीला

Margao Merchant Association: मडगावात पिंपळकट्ट्यावर भिकाऱ्यांचा उच्छाद, दारु पिऊन धिंगाणा; न्यू मार्केट व्यापारी संघटनेचा संताप

गोव्यात पर्यटकांच्या जिवाशी खेळ! समुद्रकिनारी बेदरकार गाडी चालवणं कोल्हापूरच्या पर्यटकाला पडलं महाग; पोलिसांनी दाखवला इंगा

नोकरी मागे धावण्यापेक्षा उद्योजक बना! स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची गोमंतकीय तरुणांना सुवर्णसंधी; मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेचे विशेष पाऊल

Goa Petrol Stock Status: गोव्यात मुबलक इंधनसाठा! अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पेट्रोल डीलर असोसिएशनचं आवाहन; नरहर ठाकूर यांनी स्पष्टचं सांगितलं

SCROLL FOR NEXT