Give chance to form government in Goa says AAP leader Rahul Mhambare  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोमंतकीयांनो ‘आप’ला एक संधी द्या: राहुल म्हांबरे

आम आदमी पक्षाला (AAP) एक संधी द्यावी, दिलेली सर्व आश्‍‍वासने पूर्ण करू, अशी ग्‍वाही पक्षाचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी दिली आहे

दैनिक गोमन्तक

राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला(BJP) आगामी निवडणुकीत (Goa Election) बदलण्याची मागणी प्रत्येक नागरिकाकडून होत आहे. गोमंतकीयांनी आम आदमी पक्षाला (AAP) एक संधी द्यावी, दिलेली सर्व आश्‍‍वासने पूर्ण करू, अशी ग्‍वाही पक्षाचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे (Rahul Mhambare) यांनी दिली आहे. (Give chance to form government in Goa says AAP leader Rahul Mhambare)

कुडतरी मतदारसंघात ‘आप’ने आयोजित केलेल्या परिवर्तनयात्रेत म्‍हांबरे बोलत होते. यावेळी ‘आप’चे स्थानिक नेते तथा जिल्हा पंचायत सदस्य डॉम्‍निक गावकर, रॉक मास्कारेन्‍हस व कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात महागाई वाढत चालली आहे. यामुळे गोव्यातील प्रत्येक गरीब कुटुंबाला वर्षाला एक लाख रुपये गमवावे लागत आहे. गोमंतकीयांनी ‘आप’ला सत्तेवर आणल्‍यास प्रत्येक घराचे वर्षाला पाच लाख रुपये वाचतील, असा दावा म्हांबरे यांनी केला आहे.

डॉम्‍निक गावकर म्‍हणाले की, सुरूवातीला आपण अपक्ष म्‍हणूनच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. पण, नंतर आम आदमी पक्षाने दिल्लीत केलेले कार्य पाहून भारावून गेलो. तसेच कार्य व सेवा गोमंतकीयांना मिळावी यासाठी ‘आप’च्‍या उमेदवारीवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आपण गेल्या कित्येक वर्षांपासून लोकांच्या भल्यासाठी काम करत आहे. आमदार म्हणून निवडून आल्यास लोकांची कामे करण्याची आणखी संधी मिळेल.

दरम्यान राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी ‘आप’ने घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला आहे. मोफत वीज आणि मोफत तीर्थयात्रेच्या हमींवर पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असा दावाही आपने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT