Former Member of Congress dainik gomatak
गोवा निवडणूक

पक्षाला विश्वासात न घेता चोडणकर घेतायेत निर्णय, माजी सदस्यांचा आरोप

80 पेक्षा जास्त सदस्यांनी दिला आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

दैनिक गोमन्तक

गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर हे वास्को काँग्रेस गटाच्या माजी सदस्यांना विश्वासात न घेता अनेक निर्णय पक्षा विरोधात घेत आहे. यामुळे वास्को काँग्रेस गटाच्या माजी गटाध्यक्ष, माजी सेवा दल सदस्यांबरोबर अंदाजे ८० पेक्षा जास्त सदस्यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याची माहिती, गटाध्यक्ष इमरान शेख यांनी दिली आहे. गोवा प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी गेल्या तीन वर्षापासून वास्को काँग्रेस गटाविषयी अजिबात लक्ष न देता विविध निर्णय एकतर्फी घेत आहेत. त्यामुळे वास्को काँग्रेस गटाच्या माजी सदस्य अंदाजे ८० पेक्षा जास्त सदस्यांनी आपला राजीनामा दिला आहे. अशी माहिती वास्को येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी माजी गटाध्यक्ष इम्रान शेख, माजी सेवा दल प्रमुख हुसेन शेख, श्रीमती मांजरेकर, सुनिता पाटील व इतर माजी पदाधिकारी होते.

पुढे माहिती देताना इमरान शेख म्हणाले की, गोवा (goa) प्रदेश काँग्रेस समितीचे वरिष्ठ अधिकारी वास्को मध्ये काँग्रेस (congress)पक्षाचा अजिबात विचार करत नसल्याचा आरोप करून, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आम्हाला विश्वासात न घेता निर्णय घेऊन आमच्यावर अन्याय करीत आहे. तसेच आमच्या सदस्यांना वास्कोत सध्या होत असलेल्या काँग्रेस उमेदवारीबाबत सुद्धा न कळविता निर्णय घेत असल्याचा आरोप शेख यांनी केला.

यावेळी वास्को काँग्रेस गटाचे माजी सेवादल सदस्य हुसेन शेख यांनी सांगितले की, मी गोवा प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांना भेटून या प्रकरणी माहिती दिली होती. तरीसुद्धा त्याने वास्कोत (Vasco) विधानसभा निवडणुकीसाठी तीन नावे जाहीर केली. यात माजी आमदार कार्लुस आल्मेदा, माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत, गोवा प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सैफुल्ला खान यामुळे आमच्या समोर मोठे संकट उभे राहिले असल्याची माहिती हुसेन यांनी दिली.

तसेच चोडणकर यांना सांगितले की वास्कोतील तीनही संभाव्य उमेदवारांमध्ये समजोता करून आम्हाला एक उमेदवार द्यावा अशी मागणी केली. पण चोडणकर यांनी माझे विचार गंभीरतेने घेतले नसल्याची माहिती हुसेन यांनी दिली. वास्कोत गेली दहा वर्षे आम्ही काँग्रेस पक्षाची सेवा केली तसेच राज्य सरकार (State Government) विरोधात विविध आंदोलने छेडली असताना सुद्धा आम्हावर काँग्रेस वरिष्ठ अन्याय करीत असल्याचा गंभीर आरोप हुसेन शेख यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT