Congress
Congress Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Exit Poll 2022: काँग्रेसला गोव्यात पुन्हा धक्का, सत्तेपासून राहणार वंचित?

दैनिक गोमन्तक

गोव्यात 14 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान झाले आहे. राज्यात 79 टक्के मतदान झाले. भाजप आणि काँग्रेस (Congress) यांच्यामध्ये कोण सरकार स्थापन करणार याकडे गोवेकरांचं लक्ष लागले आहे. भाजप (BJP) पुन्हा एकदा स्थापन करण्यामध्ये यशस्वी होणार का ? गोवा विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत, माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे उमेदवार चर्चिल आलेमाओ, विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे उमेदवार दिगंबर कामत, भाजप नेते रवी नाईक, अपक्ष उमेदवार लक्ष्मीकांत पार्सेकर आणि माजी मुख्यमंत्री विजय सरदेसाई यांची विश्वासार्हता पणाला लागली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत यंदाची लढत चुरशीची आहे. सत्ताधारी पक्ष भाजपला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीसह अनेक विरोधी पक्षांचे कडवे आव्हान आहे. मतदानानंतर सीएम प्रमोद सावंत यांनी विजयाचा दावा केला असून आम्हाला विश्वास आहे की, 'आम्ही 22 पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा सरकार स्थापन करु.'

दरम्यान, सरकार स्थापनेत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून चिदंबरम, गुंडू राव यांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. निवडणुकीचे निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असून, आघाडीच्या संभाव्य भागीदारांशी उच्चस्तरीय चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते गोव्यात दाखल झाले आहेत. यातच 40 विधानसभा सदस्य संख्या असणाऱ्या गोव्यात कॉंग्रेसला 12-16, भाजपला 13- 17 भाजप, आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) 1-5 आणि महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाला 5-9 तर इतर 0-2 जागा मिळतील असे एबीपी माझा आणि सी व्होटरच्या एक्झिट पोलमधून प्रथमदर्शनी दिसून येत आहे. (Exit polls suggest Congress may stay out of power in Goa)

मोलेम, आयआयटी-गोवा, मोटार वाहन कायदा ही नवीन सरकारची काही तातडीची आव्हाने

10 मार्चनंतर स्थापन होणाऱ्या नव्या सरकारला मोलेम येथील तीन रेषीय प्रकल्प, आयआयटी-गोवासाठी जमिनीचे वाटप आणि नवीन मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी यासह अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर ठोस निर्णय घ्यावे लागतील. 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारने या मुद्द्यांवरील निर्णय पुढे ढकलले, जेणेकरुन जनतेच्या विरोधाला सामोरे जावे लागू नये.

एक्झिट पोलनुसार गोव्यात पुन्हा एकदा भाजपचे (BJP) सरकार स्थापन होणार असल्याचे चित्र दिसत आहे. एक्झिट पोलनुसार, राज्यात भाजपला 16-22 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसला (Congress) 11-17 जागा मिळू शकतात. आम आदमी पक्षाला (AAP) 0-2 जागा मिळू शकतात तर इतरांना 4-5 जागा मिळण्याची शक्यता आहे.

एक्झिट पोलबाबत मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत?

भारतामध्ये 1998 मध्ये प्रथमच एक्झिट पोलबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने कलम 324 अन्वये, 14 फेब्रुवारी 1998 रोजी संध्याकाळी 5 ते 7 मार्च 1998 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलचे निकाल प्रकाशित करण्यास किंवा प्रदर्शित करण्यास मनाई केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

SCROLL FOR NEXT