Dr. Chandrakant Shetye Dainik Gomantak
गोवा निवडणूक

डिचोली मतदारसंघात डॉ. चंद्रकांत शेट्ये ठरले बाजीगर..

भाजपच्या 'कमळा' सह मगोच्या 'सिंहा' लाही डिचोलीतील मतदारांनी नाकारल्याने डॉ. शेट्ये यांच्या 'हेलिकॉप्टर'ने भरारी मारली

दैनिक गोमन्तक

तुकाराम सावंत

डिचोली: चुरशीच्या डिचोली मतदारसंघातील लढतीत अखेर अपेक्षेप्रमाणे परिवर्तन घडले असून, 2012 ची पुनरावृत्ती होऊन या मतदारसंघात पुन्हा एकदा डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या रूपाने अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. भाजपच्या ''कमळा'' सह मगोच्या ''सिंहा''लाही डिचोलीतील मतदारांनी नाकारल्याने डॉ. शेट्ये यांच्या ''हेलिकॉप्टर''ने भरारी मारली आहे. या निवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पडले असून, भाजपच्या मतांत मोठी घसरण झाली आहे. सभापती राजेश पाटणेकर हे चक्क तिसऱ्या स्थानी फेकले गेले आहेत. दरम्यान, डॉ. शेट्ये यांच्या विजयानंतर डिचोली शहरासह विविध भागात त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून विजयोत्सव साजरा केला.

अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी मगोचे नरेश सावळ यांचा अवघ्या 422 मतांनी पराभव करून विजय मिळवला आहे. गेल्यावर्षी झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत डॉ. शेट्ये यांनी आपला उमेदवार निवडून आणण्याची किमया केली होती. त्यामुळे या निवडणुकीत ते किमया साधणार हे स्पष्ट होते. आपले कार्यकर्ते आणि आपल्यावर विश्वास दाखवलेल्या मतदारांचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी विजयानंतर व्यक्त केली आहे.

सावळांना पुन्हा हुलकावणी

2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नरेश सावळ यांनी डिचोलीतून मगोच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली होती. त्यावेळीही त्यांना विजयाने हुलकावणी दिल्याने केवळ 666 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. यावेळी नरेश सावळ नव्या जोमाने निवडणूक रिंगणात उतरले होते. यावेळी तर मतदारसंघात त्यांच्याच नावाची हवा होती. सर्व्हेक्षणानंतर माध्यम समूहांनीही सावळ यांच्या बाजूनेच कौल दिला होता. मात्र यावेळीही त्यांना केवळ 422 मतांनी विजयाने हुलकावणी दिली. हा सावळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का आहे.

पाटणेकरांची पिछेहाट ?

सभापती राजेश पाटणेकर हे यावेळी निवडणूक लढविण्यास तयार नव्हते. तसे सुरवातीस त्यांनी जाहीरही केले होते. मात्र नंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मनपरिवर्तन केल्यानंतर पाटणेकर निवडणूक रिंगणात उतरले. सर्वांशी मिळून मिसळून वागणारे आणि विशिष्ट स्वभावामुळे पाटणेकर भाजपचा ''गड'' राखतील, असा भाजप नेत्यांना विश्वास होता.

मात्र तो फोल ठरला. या निवडणुकीत पाटणेकर यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. यामुळे पाटणेकर यांना हा मोठा धक्का असून, निवडणूक न लढविण्याचा सुरवातीस घेतलेला निर्णय योग्य होता. याची जाणीव या निकालानंतर त्यांना नक्कीच झाली असणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT