PratapSingh Rane Vishwajit Rane

 

Dainik Gomantak 

गोवा निवडणूक

प्रतापसिंग राणेंना कॉंग्रेसची उमेदवारी जाहीर

विश्वजीत राणेंविरुद्ध पर्ये मतदारसंघातून लढवणार निवडणूक

दैनिक गोमन्तक

पणजी : ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रतापसिंग राणे यांना पर्ये मतदारसंघातून कॉंग्रेसची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी मुकुल वासनिक एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही घोषणा केली आहे.

गोव्यात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोठी चुरस निर्माण होताना दिसत आहे. प्रतापसिंग राणेंचा (Pratapsingh Rane) पर्ये मतदार संघही सध्या गोवेकरांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याविरोधात पर्ये मतदार संघातून निडणूक लढवणार असल्याची घोषणा कॉंग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांनी केली आहे. त्यातच पक्षाने त्यांची उमेदवारी जाहीर केल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

प्रतापसिंग राणे यांनी मंगळवारी सकाळी विधानसभा निवडणूक आपण काँग्रेसच्याच उमेदवारीवर पर्ये मतदारसंघातून लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावरून राणे पितापुत्रांमध्ये दिवसभर रणकंदन माजले होते.

दरम्यान विश्वजीत राणेंनी (Vishwajit Rane) प्रतापसिंग राणेंना रणांगणात हार पत्करण्यापेक्षा सन्मानाने निवृत्त होण्याचा सल्लाही दिला होता. मात्र प्रतापसिंग राणेंनी तो धुडकावत निवडणूक लढणवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पर्ये मतदारसंघात आता पिता-पुत्र अशी रंगतदार लढत होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT