Girish Chodankar  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

...तर काँग्रेससह गोव्यातील जनता गप्प बसणार नाही: गिरीश चोडणकर

भाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्थेला फटका: चोडणकर

दैनिक गोमन्तक

पणजी: भाजपच्या राजवटीत पक्षांतरामुळे गोवा आणि गोव्याच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. राज्यातील जनता अशी कृत्ये पुन्हा खपवून घेणार नाही आणि इतिहासाची पुनरावृत्ती झाल्यास भाजप नेत्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी शनिवारी दिला. (Goa News)

चोडणकर यांनी शनिवारी पणजी येथे पत्रकार परिषद (Press Conference) संबोधित करताना सांगितले, की मुख्यमंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेले भाजपचे नेते इतर पक्षांतील संभाव्य विजयी उमेदवारांना आपल्या बाजुने नेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यावेळी काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर उपस्थित होते. प्रमोद सावंत (Pramod Sawant), विश्वजीत राणे आणि माविन गुदिन्हो हे भाजपचे (BJP) सरकार स्थापन करण्यासाठी संभाव्य विजयी उमेदवारांना आपल्या बाजुने नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे ते म्हणाले.

‘हे नेते मुख्यमंत्री होण्याच्या रिंगणात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची ही कृत्ये लोक खपवून घेणार नाहीत. पक्षांतर करण्यासाठी उमेदवारांना कोट्यवधी रुपयांची ऑफर दिली जाते. गोवावासीय हे होऊ देणार नाहीत आणि पक्षांतराला प्रोत्साहन देणाऱ्यांना धडा शिकवतील.” असे ते म्हणाले.

उमेदवारांना ‘ऑफर्स’

“आमचे संभाव्य विजयी उमेदवार, ज्यांना या ऑफर्स देण्यात आल्या, ते यापुढे भाजपचा पर्दाफाश करतील. भाजपने आपली कृत्ये बंद करावी. यावेळी आम्ही गप्प बसणार नाही, तर भाजपला लोकांच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे.’’ असे गिरीश चोडणकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT