BJP

 

Dainik Gomantak 

गोवा निवडणूक

यंदाही मयेत भाजप गतवेळचाच ‘फॉर्म्युला’ वापरणार?

गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता आगामी निवडणुकीसाठी मये मतदारसंघातून भाजपतर्फे गतवेळचा ''फॉर्म्युला'' अंमलात येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली (तुकाराम सावंत) : गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता आगामी निवडणुकीसाठी मये मतदारसंघातून भाजपतर्फे गतवेळचा ''फॉर्म्युला'' अंमलात येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. विद्यमान आमदारांना डावलून भाजपचे उमेदवार म्हणून प्रेमेंद्र शेट यांचे नाव जवळपास निश्चित झाले असतानाच, आता उद्योजक मिलिंद पिळगावकर यांचे नाव चर्चेत येत आहे.

मिलिंद पिळगावकर हे गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या (BJP) संपर्कात आहेत. त्यातच दोनच दिवसांपूर्वी मये येथे झालेल्या महिला मेळाव्यात पिळगावकर यांनी आपणाला निवडून दिल्यास मयेत उद्योग प्रकल्प सुरू करतानाच महिलांना व्यासपीठ मिळवून देणार अशी ग्वाही दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. दुसऱ्या बाजूने विद्यमान आ.प्रवीण झांट्ये (Praveen Zantye) यांचा ''पत्ता'' कट करण्याच्या भाजपच्या खेळीमुळे मये मतदारसंघातील राजकीय समीकरणेही बदलतील असे संकेत आहेत. दरम्यान, मयेचे भाजप आमदार प्रवीण झांट्ये हे ''मगो'' (MGP) च्या वाटेवर असून, लवकरच ते मगो पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

गतवेळचा ‘फॉर्म्युला’

2017 साली भाजपने वेगळा फॉर्म्युला वापरला होता. मयेतून भाजप उमेदवारीवर सलग दोनदा निवडून आलेले तत्कालीन सभापती स्व.अनंत शेट यांना बाजूला करून प्रवीण झांट्ये यांना उमेदवारी दिली. भाजपची ती चाल यशस्वीही ठरली होती. येत्या निवडणुकीतही भाजपने गतवेळचा फॉर्म्युला वापरण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी विद्यमान आमदारांना डावलून प्रेमेंद्र शेट यांना भाजपची उमेदवारी देण्याचा विचार केला आहे. यावेळी हा फॉर्म्युला यशस्वी होणार की अंगलट येणार ते आगामी राजकीय समीकरणानंतर स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT