Damu Naik Digambar kamat and Vijay Sardesai Political Fight in Goa Dainik Gomantak
गोवा निवडणूक

निकालासाठी उरले काही तास, दक्षिण गोव्यात धाकधूक वाढली

मडगाव, फातोर्डा, नावेली मतदारसंघातील निकालाबद्दल लोकांमध्ये उत्कंठा शिगेला

दैनिक गोमन्तक

मडगाव : गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा दिवस अगदी समोर येऊन ठेपला आहे आणि सासष्टीतील मडगाव, फातोर्डा, नावेली या महत्वाच्या मतदारसंघातील निकालाबद्दल लोकांमध्ये उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

एरव्ही याआधी झालेल्या निवडणुकांमध्ये मडगावच्या निकालाकडे दुर्लक्षच केलं जात असे,कारण कॉंग्रेस उमेदवार दिगंबर कामत हे सदैव तुल्यबळ उमेदवारच असायचे. पण या वेळी उपमुख्यमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांना त्यांच्या विरोधात उभे करुन भाजपने त्यांच्यासमोर कडवं आव्हान उभं केलं आहे. यापूर्वी कधीही केला नसेल एवढा मोठ्या प्रमाणात प्रचार कामत यांनी मडगावात केला आहे. केवळ 15 दिवसात बाबू आजगावकरांनी पूर्ण मडगाव मतदारसंघ पिंजून काढला आहे.

बाबू आजगावकर मूळचे मडगावचेच असल्याने आणि त्यांचा दक्षिण गोव्यातील नेत्यांशी चांगला संपर्क असल्याने त्यांनी प्रचारात रंगत आणली. दिगंबर कामत झोपडपट्टीतील मतदारांच्या आधारे निवडून येत असत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण यावेळी बाबूने पण झोपडपट्टीपर्यंत आपली मजल मारली आणि त्या परिसरातील मते आपल्याकडे झुकतील अशी स्थिती निर्माण केली होती. त्यासाठी कामत यांना शहरी मतदारांवर जास्त भर द्यावा लागला.
मडगावात काही प्रमाणात जातीय राजकारणाने डोके वर काढले असले तरी भाजपचे मूळ मतदार दिगंबरच्या बाजूने असतील की ते भाजपकडेच प्रामाणिक राहतील हे निकाल लागल्यावर स्पष्ट होईल. या एकाच कारणास्तव भाजप आणि कॉंग्रेस गटामध्ये थोडी धाकधूक निर्माण झाली आहे.

यावेळी मडगावात 29505 पैकी 22156 मतदान झाले आहे. त्यामुळे जो उमेदवार साडेदहाच्या आसपास पोहोचेल त्याला जिंकण्याची जास्त संधी आहे. पण जो कोणी जिंकेल तो अवघ्याच मताधिक्क्याने जिंकू शकेल असं बोललं जात आहे.

फातोर्डा मतदारसंघातही गोवा फॉरवर्डचे (Goa Forward Party) विजय सरदेसाई आणि भाजपचे दामू नाईक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली आहे. गेल्या दोन निवडणुकांत नव्हते तेवढे दामूचे कार्यकर्ते उत्साहित दिसत आहेत. विजय सरदेसाईंचे काही एसटी मतदार दामूच्या बाजूने झुकल्याने दामूला विजयाची जास्त संधी असल्याचे बोलले जाते.

भाजपच्या (BJP) काही समर्थकांनी दामू यांना 10500 ते 11200 मते तर विजयला 9400 ते 9700 मते पडतील असे भाकीत केले आहे. निवडणुकांच्या काही दिवसांपुर्वी दामू नाईकने विजयच्या काही समर्थकांनाही आपल्या बाजुने आणण्यात यश मिळविले. विजय सरदेसाईने गेल्या दहा वर्षांत फातोर्डा मतदारसंघात विकास केला आहे.

फातोर्ड्यात 30839 पैकी 23651 म्हणजेच जवळजवळ 77 टक्के मतदान झाले आहे.
नावेलीत या वरील दोन्ही मतदारसंघापेक्षा जास्त चुरस निर्माण झाली आहे. नावेलीत भाजपची मते आहेत. त्यामुळे कॉंग्रेस किंवा इतर पक्षातील मते आवेर्तान फुर्तादो (Congress), वालंका आलेमाव (TMC) व प्रतिमा कुतिन्हो (AAP) यांच्यामध्ये विभागली जातील व त्याचा फायदा कदाचीत भाजपचे उल्हास तुयेकर याना मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT