Delhi CM and AAP Chief Arvind Kejriwal was in Goa on Monday ahead of Assembly Elections
Delhi CM and AAP Chief Arvind Kejriwal was in Goa on Monday ahead of Assembly Elections  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Arvind Kejriwal: गोव्यात सरकार आलं तर मोफत तीर्थयात्रेसह मोफत दर्शन देणार

दैनिक गोमन्तक

जर गोव्यात (Goa) आपची (Aam Aadmi Party) सत्ता आली तर आमचे सरकार हिंदूंसाठी अयोध्येला (Ayodhya) आणि ख्रिश्चनांसाठी वालंकिणी मोफत तीर्थयातत्रेच आयोजन करेल तसेच मुस्लिमांनासाठी आम्ही अजमेर शरीफ (Ajmer Sharif) साठी तर साई भक्तांना शिर्डीला मोफत दर्शन यात्रा देऊ असे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी गोव्यात दिले आहे.

आगामी विधनसभा निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल सध्या गोवा दौऱ्यावर आहेत.

भारतात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. देशातील सर्वच राजकीय पक्षांनी याची जय्यत तैयारी देखील सुरु केल्याचे दिसते. यात गोव्याचा देखील समावेश आहे.

भारतात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. देशातील सर्वच राजकीय पक्षांनी याची जय्यत तैयारी देखील सुरु केल्याचे दिसते. यात गोव्याचा देखील समावेश आहे. आम आदमी पक्षाने देखील प्रचाराची तैयारी सुरु केली असून पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे गोव्यात होते. पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधारी भाजपला तसेच काँग्रेसवर सडकून टीका केली. "भाजप-काँग्रेस दोघेही वाटून मलई खातात. काँग्रेसची सत्ता असताना भाजपने काँग्रेस भ्रष्ट असल्याचे सांगितले. तेव्हापासून भाजपने काँग्रेसच्या एकाही नेत्याला तुरुंगात कसे पाठवले नाही? दोघांनीही एकमेकांवर कारवाई न करण्याचे मान्य केले आहे," असं केजरीवाल म्हणाले.

रविवारी ट्विट केल्याप्रमाणे आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सोमवारी ‘भावनिक’ गुगली टाकली. राज्यात सरकार आल्यास हिंदुंना शिर्डी-अयोध्या, ख्रिश्‍चनाना वालंकिणी आणि मुस्लिमांना अजमेर शरिफच्या सहलीची आॅफर त्यांनी दिली. यापूर्वी त्यांनी मोफत वीज पुरवठा आणि रोजगाराच्या हमीची घोषणा केली होती.

राज्य सरकारने यापूर्वी राज्यातील लोकांसाठी धार्मिक स्थळांच्या सहलीची योजना घोषीत केली होती, मात्र ती फोल ठरली आहे. दिल्लीत ज्या सामान्यांना त्यांच्या इच्छीत धार्मिक स्थळांना भेट देण्याचे भाग्य मिळत नाही, त्यांच्यासाठी सरकारकडून विशेष सहलीची सोय करण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. गोव्यातील जनतेलाही अशा सहलीसाठी विशेष अनुदान देऊ, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. एकंदर केजरीवाल यांनीही ‘भावनिक गेम’ खेळला आहे.

भ्रष्‍टाचार्‍यांना तुरूंगात डांबू

मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभिर आरोप केले आहेत. तरीही पक्ष त्याबाबत गंभिर नसल्याबाबत केजरीवाल यांनी खेद व्यक्त केला. राज्यातीत भ्रष्ट मुख्यमंत्री बदलण्याऐवजी केंद्र सरकारने त्यावेळी राज्यपालच बदलला. पण, सत्य अधिक काळ लपून राहत नाही. आम्ही सत्तेत आल्यानंतर मात्र भ्रष्टाचार्‍यांना तुरूंगात डांबू, असे केजरीवाल म्हणाले. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवरही सडकून टीका करतांंना तेही भाजपशी मिळून भ्रष्टाचार करीत असल्‍याचा आरोप त्यांंनी केला.

दिदी माझ्याबद्दल असे बोलणार नाहीत

प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजी यांनी तुमच्यावर टीका केली आहे असे सांगितले असता, केजरीवाल यांनी ‘दिदी माझ्याबद्दल असे बोलणे शक्यच नाही’ अशी कोटी केली. त्यांच्‍या या बोलण्यातून आगामी निवडणुकीतील अनेक गुंतागुतीवरून पडदा उघडला गेला आहे. राज्यात ४० टक्के महिलांना विधानसभेसाठी उमेदवारी देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Goa Poster Launch: फ्रान्स येथील कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचे पोस्टर लाँच

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

Supreme Court: ‘’बस्स! पुरे झाले, तुम्ही निकाल न वाचताच आला आहात...’’; CJI चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी कोर्टरुममध्ये का संतापले?

Panaji News : सांताक्रुझ मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार : आमदार रुडाॅल्फ फर्नांडिस

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT