Manish Sisodia Dainik Gomantak
गोवा निवडणूक

आप नेते मनीष सिसोदिया गोव्यात दाखल; पक्षाच्या उमेदवारांचा करणार प्रचार

विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सिसोदिया म्हणाले, आम आदमी पार्टी गोव्याला भ्रष्टाचार मुक्त सरकार देण्यास प्रयत्नशील आहे.

Akash Umesh Khandke

पणजी: आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा प्रचार करण्यासाठी अनेक नेते गोव्यात दाखल होत आहेत. दरम्यान, दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया आज (शनिवार) गोव्यात आले आहेत. सिसोदिया गोव्यात आम आदमी पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. (Goa Assembly Election 2022)

विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सिसोदिया म्हणाले, आम आदमी पार्टी गोव्याला भ्रष्टाचार मुक्त सरकार देण्यास प्रयत्नशील आहे. ते पुढे म्हणाले, गोव्यातील लोकांनी कोंग्रेस (Congress) आणि भाजपला अनेक वेळा संधी दिली आहे. त्यांनी आपला एक संधी द्यावी. आम्ही गोव्याला स्थिर सरकार देऊ.

आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) देखील गोव्यात पार्टीचा प्रचार करत आहेत. त्यांनी विश्वास दर्शवला आहे की राज्यात आपला बहुमत मिळेल. गोव्यात केजरीवाल अन्य पक्षांबरोबर युती करणार का, असे पत्रकारांनी विचारले असता त्यांनी उलट प्रश्न केला की, कोणासोबत युती करायची? गोव्याला काँग्रेसने (Congress) 25 वर्षे लुटले. भाजपने देखील गोव्याला लुटण्याशिवाय दुसरे काहीही केलेले नाही. लोकांनी आपला एक संधी द्यावी. सध्या सर्वच पक्षांच्या उमेदवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. आम्हाला जनतेने निवडून दिल्यास आम्ही गोव्याला प्रामाणिक सरकार देऊ, असे केजरीवाल म्हणाले. आगामी काळात अनेक दिग्गज नेते गोवा (Goa) दौऱ्यावर येणार आहेत. यामध्ये अमित शहा, नितीन गडकरी, प्रियंका गांधी यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT