Serendipity Arts Festival 2024 Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Serendipity Arts Festival: सेरेंडिपिटी महोत्सव कोरिओग्राफर्सच्या शोधात! प्रस्ताव पाठवायचे आवाहन

Serendipity Arts Festival: सेरेंडिपीटी कला महोत्सवात 'फोलिओज ऑफ टाईम' हे एक असे सादरीकरण असेल ज्यात समकालीन समस्या नृत्यात्मक हालचालींमधून संबोधित केल्या जातील

गोमन्तक डिजिटल टीम

डिसेंबर महिन्यात होणाऱ्या गोव्यात होणाऱ्या सेरेंडिपीटी कला महोत्सवात 'फोलिओज ऑफ टाईम' हे एक असे सादरीकरण असेल ज्यात हवामान आणि पर्यावरणातील बदल, युद्ध, स्थलांतर यासारख्या समकालीन समस्या शारीरिक नृत्यात्मक हालचालींमधून संबोधित केल्या जातील. या सादरीकरणासाठी सेरेंडिपिटी कला महोत्सवाने इच्छुक कोरिओग्राफरकडून प्रस्ताव मागवले आहेत. या सादरीकरणासाठी महोत्सव एकूण सहा कोरिओग्राफर्सच्या शोधात आहे. 

या व्यतिरिक्त विणकाम कलेतून (मेशवर्क) मातृत्व आणि बाह्य जग यातील संबंध 'म(अदर)हूड' (M(other)hood) द्वारे अभिव्यक्त करण्यासाठी तीन कलाकारांची निवडही हा महोत्सव करणार आहे. या दोन्हीही विभागातील कलाकारांकडून सेरेंडिपिटीला त्वरित प्रतिसाद अपेक्षित आहे.

‘फोलिओज ऑफ टाईम'साठी निवडलेल्या कोरिओग्राफरना प्रसिद्ध इटालियन नृत्य दिग्दर्शक  डॅमियानो बिगी आणि ड्रामाटर्ज पाओलेटी  यांच्या मार्गदर्शनाखाली बेंगलोरमध्ये 3 ते १४ डिसेंबर 202४ या कालावधीत कठोर प्रशिक्षण घ्यावे लागेल. प्रसिद्ध जपानी डिजिटल कलाकार कुनिहीको मात्सुओ यांचेही मार्गदर्शन या प्रशिक्षणादरम्यान लाभणार आहे. 

मातृत्व या संकल्पनेतून २०२१ मध्ये सुरू झालेल्या 'म(अदर)हुड' या प्रकल्पाला यंदा सेरेंडिपीटी आपले पाठबळ देणार आहे. त्यासाठी सॅफ- 2024 एक विशेष योजना आखत आहे.

या प्रकल्पासाठी निवडलेल्या व्यक्ती व्याख्यानात्मक सादरीकरणातून वैयक्तिक अनुभव आणि संदर्भामधून आत्मचरित्र, इतिहास आणि आपल्या कहाण्यांमधून एक प्रायोगिक दृष्टिकोन बहाल करतील अशी अपेक्षा आहे. सेरेंडिपिटीच्या संकेतस्थळावरून यासंबंधी अधिक माहिती मिळवता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा आध्‍यात्‍मिक पर्यटनाचे केंद्र व्हावे, क्लब रात्री 12 नंतर बंद करावेत; दुर्घटना कमी होतील- मंत्री विश्‍‍वजीत राणे

Goa Zilla Panchayat: जिल्हा पंचायतीत 'नारीशक्ती'ला प्राधान्य, उत्तर गोवा हे अध्‍यक्ष, तर 'दक्षिण'साठी उपाध्‍यक्षपद महिलांसाठी राखीव

दुर्घटना घडल्‍यास जबाबदार कोण? दायित्त्‍व नक्‍की करा, उच्‍च न्‍यायालयाचे राज्य सरकारला निर्देश; घेतली स्‍वेच्‍छा दखल

Goa Drowning Death: शेजाऱ्याकडे ठेवला, खेळताना तळ्यात पडला; तळेबांद येथे दीड वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू

मानवी क्रौर्याची परिसीमा! शीर, हात आणि पाय नसलेला आढळला मृतदेह, खुनाच्या भयानक घटनेने खळबळ; पोलिसांकडून तपास सुरु

SCROLL FOR NEXT