Makar Sankranti Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Makar Sankranti: सुगडाची पूजा आणि बुडकुल्यांचं वाण; गोव्यातील संक्रांतीची परंपरा छान

Makar Sankranti celebration: गोव्याच्या परंपरेत संक्रांतीच्या सुघट दानाला फार महत्व आहे.

Akshata Chhatre

Makar Sankranti celebration Goa: सण, उत्सव आणि परंपरा गोव्याने कायम जपली आहे. तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं म्हणत संक्रांतीचा सण आज येऊन ठेपला आहे. संक्रांतीचा दिवस खास करून महिलांसाठी महत्वाचा ठरतो. संक्रांतीच्या हळदी-कुंकवाच्या निमिताने महिला एकत्र जमतात, गप्पा होतात, गोष्टींची देवाणघेवाण होते. गोव्याच्या परंपरेत देखील संक्रांतीच्या सुघट दानाला फार महत्व आहे.

गोव्यातील मकर संक्रांत

गोव्यात संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक घरात सुगड पूजन केलं जातं. या घटात वेगवेगळ्या प्रकारची कढधान्य, हिरव्या काचेच्या बांगड्या, हळद-कुंकू आणि सौभाग्याचं वाण ठेवून त्याची पूजा केली जाते आणि पूजा सांगायला आलेल्या ब्राह्मणाला हा घट दान केला जातो. सौभाग्य चिरतरुण राहावे म्हणून महिला मनोभावे या घटाची पूजा करतात. यात तिळगुळाचा नैवेद्य दाखवला जातो.

संध्याकाळी महिलावर्ग एकत्र ठेऊन हळदी-कुंकवाचा कार्यक्रम केला जातो. मकरसंक्रांतीच्या हळदी-कुंकवाचं महत्त्व म्हणजे या दिवशी महिला काही-ना-काही वस्तू वाण म्हणून देतात. लग्न झाल्यानंतर पहिले पाच वर्ष काय द्यावं हे ठरलेलं असतं आणि त्यांनतर मनाला रुचेल ती भेट देता येते.

गोव्यात लग्नानंतरच्या पहिल्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात मातीचा छोटासा घट वाण म्हणून दिला जातो, ज्याला स्थानिक भाषेत बुडकुली असं म्हणतात. यानंतर एकावर्षी हिरव्या बांगड्या, नारळाची वळी, पानाचा विडा अशा वस्तू देण्याची रीत आहे.

तिळगुळाचं महत्व काय?

तीळ आणि गूळ एकत्र करून वड्या किंवा लाडू बनवले जातात. तीळ आणि गूळ हे शरीराला उष्णता देतात, संक्रांतीचा सण हा थंडीच्या दिवसांत येतो म्हणून या दिवशी तीळ आणि गुळाला महत्व आहे.

मकरसंक्रात का साजरी केली जाते?

सूर्य बारा राशींमध्ये भ्रमण करत असतो, ज्याला संक्रमण असं म्हणतात. आपण बारा राशी मानतो, त्यामुळे वर्षभरात सूर्य बारा राशींमध्ये प्रवेश करत असतो आणि वर्षभरात एकूण बारा संक्रांती येतात. मात्र आपल्याकडे मकरसंक्रांतीला विशेष महत्व आहे. यावेळी सूर्य उत्तरायणाचा काळ सुरुवात होते. या संक्रमणापासून भारतीयांना अधिक प्रकाश व उष्णता यांचा लाभ होतो आणि म्हणून आपल्याकडे संक्रांतीची जुनी परंपरा आहे. हा कालखंड पूजा, जपजाप्य, धार्मिक कार्यांसाठी महत्वाचा मानला जातो.

संक्रातीला काळे कपडे का वापरावेत?

खरंतर सणाच्या दिवशी कोणी काळे कपडे वापरात नाही, मात्र संक्रांत हा थंडीच्या दिवसांत येणारा सण असल्याने उबदारपणा मिळायला काळ रंग मदत करतो. शरीराला उब मिळते. एक पौराणिक कथा असंही सांगते की यादिवशी सूर्याने त्यांचा पुत्र शनी याला माफ केलं असल्याने शनिदेव याच दिवशी सूर्यनारायणाला भेटायला आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT