Bandiwade Mahalaxmi Temple  Mahalaxmi Sansthan
गोंयची संस्कृताय

Navratri 2024: स्थापत्यशैलीवर गॉथिक शैलीचा प्रभाव, पारसी माणसाची देणगी; बांदिवडेतील तेराव्या शतकातील मंदिराबद्दल माहितीये?

Goa Navratri 2024: महाजन व कुळांमध्ये या देवस्थानचे फार महत्व आहे. हे देवस्थान कुलदैवत तसेच पालवी म्हणजेच जोड देवस्थान म्हणून ओळखले जाते.

गोमन्तक डिजिटल टीम

Mahalaxmi Temple History Importance In Marathi

प्रा. विघ्नेश शिरगुरकर वांते, सत्तरी गोवा

गोव्याचा अंतर्गत भाग विशेषतः मध्य भाग हा अधिकाधिक सुंदर, आकर्षक व सचेतन देवादिकांच्या देवस्थान व संस्थानांनी नटलेला आहे. या देवतांच्या मांदियाळीत अग्रक्रमाने ओळखले जाणारे मंदिर म्हणजे बांदिवडे गावात असलेले श्री महालक्ष्मी संस्थान.

हिरवीगार शेती, शेती पोफळीच्या बागा, गोड पाण्याचे झरे आणि तलाव अशा नैसर्गिक साधनांनी व अलंकारांनी नटलेल्या बांदिवडे व नागेशी गावांच्या या भागाला अत्रुंज असे म्हणतात व हेच नाव प्राचीन काळी संपूर्ण महालाला म्हणजेच तालुक्याला पडले असे अनुमान निघते. बांदिवडे गावाला प्राचीन काळात 'बंदवाड' किंवा 'बंदेवाड ग्राम' या नावाने ओळखत असत.

इतिहास (History Of Mahalaxmi Temple)

ही देवी मूळची याच गावातील आहे. ती किनारपट्टीवरील कोलवा गावातून स्थलांतरित झालेली देवी नसून बांदिवडे गावची निजनिवासिनी आहे. श्री महालक्ष्मीची मूर्ती, कोल्हापूरच्या अंबाबाई महालक्ष्मीची मूर्ती व बाटाबाटीच्या काळात जी महालक्ष्मी कोलवेकरीण कोलवा गावातून बांदिवडे गावात आली यांच्या मूर्तीत अजिबात फरक नाही.

Mahalaxmi Temple

महालक्ष्मी कोलवेकरीण देवीची मूर्ती आत गर्भगृहात एका बाजूला स्थापित आहे. हे‌ देवस्थान साधारणतः तेराव्या शतकातील असावे असा अंदाज आहे. नागेशी येथे सापडलेल्या शिलालेखावरून ही बाब स्पष्ट व सिध्द होते.

ज्या सट्टो (सावंत) व फट्टो (फट्टे) घराण्यातील पुरूषांनी श्री महालक्ष्मी कोलवेकरीण देवीला कोलव्यातून तळावरील व तळावलीतून बादिवड्यात आणली त्यांच्या नावाची छोटीशी घुमटी मंदिराच्या समोर गरूडस्तंभाच्या मागे स्थापित आहे.

महत्व (Importance)

देवीचे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला श्री नारायण देव, डाव्या बाजूला श्री रवळनाथ समाज यील बाजुस श्री बाळेश्वर व सट्टो-फट्टो हे देव आहेत. देवस्थानच्या समोरील महाद्वार हे मुख्यद्वार आहे व या द्वाराच्या वर देवीचा नगारखाना आहे.

Goddess Mahalaxmi

श्री महालक्ष्मी व श्री नागेश ही दोन दैवते मूळची अनुक्रमे बांदिवडे व नागेशी गावचीच आहेत, स्थलांतरित नाहीत. देवळाच्या उजव्या बाजूला तलाव आहे ज्यात उत्सवाच्या वेळी देवीचा नौकाविहार आयोजित केला जातो.

महाजन व कुळांमध्ये या देवस्थानचे फार महत्व आहे. हे देवस्थान कुलदैवत तसेच पालवी म्हणजेच जोड देवस्थान म्हणून ओळखले जाते. उदाहरणार्थ, ज्याचा कुलदेव नागेश महारुद्र त्याची पालवी देवता महालक्ष्मी असु शकते.

वैशिष्ट्य

हे देवस्थान गोव्यातील इतर सहा देवस्थानांशी धार्मिक व महाजन सदस्यत्वाच्या दृष्टीने संलग्न आहे. श्री नागेश, श्री दामोदर, श्री सप्तकोटेश्वर, शांतादुर्गा, श्री मंगेश व‌ श्री महागणपती अशी ही देवस्थाने आहेत.

Inside Mahalaxmi Temple

या देवस्थानचा सभामंडप बांधण्यासाठी एका पारसी माणसाने नवस केल्याप्रमाणे देणगी दिली होती व‌ तो‌ बांधून घेतला. ह्या देवस्थानच्या स्थापत्यशैलीवर गॉथिक शैलीचा थोडाफार प्रभाव दिसून येतो.

सभामंडपात छताला टांगलेले काचेचे बरणीसारखे झुंबर वा दिवे जुन्या पोर्तुगीजकाळाची आठवण करून देतात. मंदिरावर भारतीय, आधुनिक व पाश्चात्य शैलीचा प्रभाव आहे.

देवस्थानच्या प्राकारात वसलेल्या अनेक घरांपैकी एक घर सुप्रसिद्ध लेखिका माधवी देसाई यांचे आहे तर सुप्रसिद्ध गायिका व पं जितेंद्र अभिषेकी यांच्या गुरूमाऊली श्री गिरीजाबाई केळेकर यांच्या घराचे केवळ अवशेष शिल्लक आहेत. मंदिराच्या चारही बाजूंना भक्तनिवास, सभागृह, वैयक्तिक निवास, देवस्थानची प्रशासकीय कार्यालये अशा वास्तु उभारलेल्या आहेत.

आजुबाजुला फुलझाडे व बागेत सुंदर हिरवळ राखल्यामुळे मंदिराचा बाहेरील भाग अतिशय रमणीय व शांत आहे. मंदिरात तशी सहसा गर्दी होत नसल्याने सभामंडप व प्रदक्षिणा असा अंतर्गत भाग शांत, स्थिर, धीरगंभीर असतो‌.

Top View Of the Temple

How To Reach/ Nearby Places

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हे मंदिर फक्त ६० किमी तर दाबोळी विमानतळ ३२ किमी आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे मडगाव रेल्वे स्टेशन व हे ठिकाण फक्त २२ किमी अंतरावर आहे.

नवरात्रीत मंदिरात रोज सकाळी अभिषेक, महापूजा व संध्याकाळी किर्तन, आरती मखरोत्सव व आरती तद्नंतर प्रसाद वाटप हे नऊही दिवस आयोजित व पुर्वनियोजित केलेले असतात. मखरात बसलेली देवी महालक्ष्मीची अतिशय सर्वांगसुंदर व सर्वगुणसंपन्न भासणारी मूर्ती भक्तांच्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय रहात नाही.

ताशा, कांसाळें, सनई, व ढोला या वाद्यवृंदाच्या संथ, मध्यम व वेगवान तालावर तितक्याच संथ, मध्यम व वेगाने हलणारं श्रीचं मखर पाहणं हा उत्सव डोळ्यांचं पारणं फेडणारा असतो व हे दरवर्षी असतं.

Temple Premises

राहण्याची सोय (Where To Stay)

देवस्थानच्या भक्तनिवासातील खोल्या या नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने तीन ते चार महिने आधीच आरक्षित केलेल्या असतात त्यामुळे इथे खोली मिळणे अत्यंत कठीण असते. फोंडा शहरात व फार्मागुडी येथे चांगली हॉटेल्स उपलब्ध आहेत. गोव्यातील अंतर्गत व मध्य भाग असल्याकारणाने हॉटेल्समध्ये रूमचे दर किनारपट्टी भागाच्या तुलनेने स्वस्त असतात.

खर्च (Cost)

इतर मंदिराचे दर्शन व प्रवास लक्षात घेतल्यास दिवसाचा खर्च जवळपास ₹२०००-३०००त होऊन जातो.

हे करा (Do's)

- देवळात जाताना अंगभर कपडे घालून जा.

- शांतता राखा.

- शिस्त पाळा.

- या मंदिरात महाजनांनी, भक्तांनी व पर्यटकांनी जबाबदारीने वागणे बंधनकारक आहे.

हे करू नका (Dont's)

- तोकडे कपडे घालून देवळात जाणे टाळावे.

- उगाच मोठ्या आवाजात बोलणे टाळावे.

- सभामंडपात गोंगाट करू नये.

- आपल्या मुलांना देवस्थान प्राकारात हवे तसे खेळू देणे टाळावे.

- प्रदक्षिणा प्राकारात शीळ घालणे टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

SCROLL FOR NEXT