Kunbi saree Goa culture Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Kunbi saree Goa culture: हातमागावर कुणबी साडी विणणाऱ्या स्त्रिया ह्या अदृश्यच असतात. त्यांच्या संस्कृतीबद्दल सामान्य गोवेकराला कितीशी माहिती आहे? त्यांनी विणलेल्या कापडाचे भवितव्य काय, त्या ज्ञानाचं पेटंट कुणाकडे राहील, ते कुठल्या किंमतीत विकलं जाईल इत्यादी गोष्टी ठरविण्यात कुणबी समूहाची किती भागीदारी आहे?

गोमंतक ऑनलाईन टीम

गेल्या काही वर्षात कुणबी साडी ही गोव्याची ओळख म्हणून पुढे करण्याचे प्रयत्न चालू आहेत. वेंडेल रॉड्रिगीस, वर्मा डिमेलो सारख्या फॅशन डिझायनर्सनी कुणबी साडी वापरून तिला आधुनिक रूप देण्याचे काम केले आहे. आता सरकारी पातळीवरही तिला जीआय टॅग देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

भारतातील विविध भागात जशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या लोकप्रिय आहेत, त्याच धर्तीवर गोव्याची ओळख कुणबी साडीपासून व्हावी ह्यात गैर काहीच नाही. पण कुणबी साडीच्या ह्या बाजाराभिमुख अवतारात कुणबी समुदाय, विशेष करून कुणबी स्त्रिया कुठे आहेत? कुणबी साडीला मिळणाऱ्या बाजारपेठेतील किती टक्के नफा हा कुणबी स्त्रियांकडे पोचतो आणि इतक्या वर्षात कुणबी समूहातून एखाददुसरा फॅशन डिझायनर का निर्माण झाला नाही?

श्रमिक समूहांच्या संस्कृतीचा वापर करून त्यापासून सत्तेसाठी सोयीस्कर अस्मितांची निर्मिती करणे ही एक जुनी खोड आहे. गोवाही त्याला अपवाद नाही. पण ते करताना ज्या समूहांची संस्कृती आपण बाजारपेठेत आणून उभी करत आहोत, त्या समूहाला तिचा नगण्य फायदा मिळणे व त्या संस्कृतीबद्दल ज्ञाननिर्मिती करण्याची मक्तेदारी उच्च्भ्रू आणि सत्तधारी वर्गाकडे जाणे हे एकप्रकारचे शोषणच आहे.

उदाहरणार्थ सांगायचे झाले तर गोव्याची लोकसंस्कृती गोव्यातील कित्येक समूहांनी जपली पण त्यावर तज्ञ म्हणून नावारूपास आले फळदेसाई आणि खेडेकर. ज्यांच्याकडून माहिती घेऊन ह्यांनी पुस्तके लिहिली त्या असंख्य गोमंतकीयांची नावे तरी आपल्याला आज माहीत आहेत का? कुणबी साडीचेही तसेच आहे. गोमंतकीय सधन वर्गातील स्त्रियांमध्ये कुणबी साडीची क्रेझ पाहता प्रश्न असा पडतो की, हे जे तथाकथित फॅशन डिझायनर्स ज्या कुणबी स्त्रियांकडून विणकाम, रंगनिर्मिती वगैरे शिकतात त्यांची नावे कधीच पुढे का येत नाही? त्यांचे कोणी शोज आयोजित करत नाहीत आणि कुठलाही चॅनल त्यांचा मुलाखती घेत नाही. ज्या महागड्या स्टुडियोमध्ये ह्या साड्या विकल्या जातात तिथे ह्या कुणबींना त्यांच्या साड्या परवडणे दूर, त्यांना तिथे निःसंकोच प्रवेशही करता येईल, ह्याविषयी शंका आहे.

संस्कृती जपण्याच्या नावाखाली ही दिवसाढवळ्या केलेली लूट आहे. गोव्याच्या पर्यटनविश्वात अजून एक हमखास विकला जाणारा सांस्कृतिक प्रॉडक्ट म्हणजे सारस्वत फूड. आता ह्यात इतर ज्ञातीसमूहांकडे बनणाऱ्या पदार्थांचा अंतर्भाव असला तरीही संबंध गोमंतकीय खाद्यसंस्कृतीची ओळख ही एका ज्ञातीसमूहाच्या नावाने प्रचलित केली गेली आहे.

पण ‘सारस्वत फूड’ ह्या लेबलखाली कुठले पदार्थ असावेत, किंवा कुठल्या पदार्थात हिंग कमी टाकलं तर ते सारस्वतेतर फूड गणलं जाईल का नाही हे ठरवण्याचा मक्ता आज त्या समूहाकडे आहे. अस्सल सारस्वत फूड हे त्यांनीच चालवलेल्या खानावळीत मिळतं आणि ते किती किमतीला विकावं हेही तेच ठरवतात. पण हातमागावर कुणबी साडी विणणाऱ्या स्त्रिया ह्या अदृश्यच असतात.

त्यांच्या संस्कृतीबद्दल सामान्य गोवेकराला कितीशी माहिती आहे? त्यांनी विणलेल्या कापडाचे भवितव्य काय, त्या ज्ञानाचं पेटंट कुणाकडे राहील, ते कुठल्या किंमतीत विकलं जाईल इत्यादी गोष्टी ठरविण्यात कुणबी समूहाची किती भागीदारी आहे? त्यांच्या श्रमावर तथाकथित फॅशन डिझायनर्स आपले फॅशन शोज करतात, सधन स्त्रिया ठेकेदार बनून कुणबी साड्या विकण्याचे व्यवसाय सुरू करतात पण त्याचा फायदा ती साडी निर्मात्या स्त्रियांकडे पोचत नसेल तर हे निव्वळ शोषण आहे.

कुणबी स्त्रियांनी आपलं घर, आपलं ज्ञान ह्या लोकांसाठी खुलं करावं आणि ह्या लोकांनी कुणबी स्त्रियांना कुठलंही क्रेडिट न देता ते लुटून न्यावं हा कुठला न्याय झाला. ह्या ठेकेदारांच्या फायद्यासाठी संस्कृती जपावी? जर ह्या साडीमुळे त्यांची जात अधोरेखित होऊन त्यांना भेदभावाचा सामना करावा लागणार असेल तर त्यांना हि साडी नेसून सार्वजनिक ठिकाणी कुठल्या मनस्थितीतून जावे लागत असेल? पण एवढ्या हौसेने कुणबी साड्या मिरविणाऱ्यांच्या वाटेला कुणबी स्त्रियांच्या नशिबी असलेले भोग वाट्याला आलेत का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT