Music Conferences Goa Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Goa Opinion: महासागरातील किती शिंपले वेचायचे? ‘पाव मात्रेला लय चुकली तर प्रलय होतो'; गावांतील संगीत संमेलनांतून आम्ही घडलो..

Music Conferences Goa: आज ‘सुरश्री’ धरून इतर काही संमेलनातील लोकांची उपस्थिती बघा. सातशे आसनांचं सभागृह गच्च भरून जावं म्हणून काय प्लॅन आहे?

गोमन्तक डिजिटल टीम

अ‍ॅड. अमोल थळी

अन्य संगीत संमेलने फालतू असतात का?’ हा गोरख मांद्रेकरचा कालचा लेख वाचनात आला. त्यांनी जे मुद्दे विकास कांदोळकरांच्या लेखाला प्रतिवाद करताना उपस्थित केले आहेत ते बरोबर आहेत. गोरख मांद्रेकर यांना अनेक कलाकारांना साथ करताना मी पाहिले आहे. गावातील, शहरातील, घरातील पूजेच्या बैठकीच्या मैफलीत आणि छोट्यामोठ्या संमेलनात त्यांनी तबला साथ केली आहे.

मांद्रेकर कुटुंबीय आणि आमचे थळी कुटुंबीय यांची संगीत साधना पिढीजात. संगीत ही फार मोठी चीज आहे. सूर, ताल, लय, ठेका या गोष्टींचं ज्ञान पुस्तकातून होत नाही. ते आकळून त्याला दाद देणे ही नंतरची रसिक गुणग्राहकाची स्टेज. संगीतही जगावं लागतं.

संगीत हा महासागर आहे. त्यात पावित्र्य आणि दिव्यत्व आहे. माझा तर असा विचार आहे की शाळाशाळांतून इंटरव्हलला किंवा आरंभाला असेम्ब्लीवेळी मुलं वर्गात जाताना शांत वाद्यसंगीत वा प्रार्थनेसारखे रागदारी संगीत वाजवावे.

मोठ्या आवाजात नव्हे. सुखदायी आनंददायी. हे संस्कार मुलं विसरणार नाहीत. कला संस्कृती खात्याने जे संगीत शिक्षक स्कुलात पाठवून संगीत धडे शिकवण्याचा उपक्रम चालवलाय तो स्तुत्य आहे.

गावात उपस्थिती खूप असते. मी महेशकुमार चिंचखंडी व वसंतराव काडणेकर यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. संगीताचा एक दृष्टिकोन तयार झाला. संगीत विचाराला दिशा मिळाली. कालांतराने गावातील संमेलनातच मला गाण्याचं व्यासपीठ मिळालं.

त्याचं श्रेय व कृतज्ञता मी आयोजकांना देतो. आठवण आहे ती पेडण्याला झालेली संमेलने. दिवसभर प्रत्येक गायकाला गाण्याची संधी मिळायची. आनंद मिळायचा. गुरुजन असायचे. नंतर त्यांचं सादरीकरणानंतरचं मार्गदर्शन फार लाभदायक असायचं. म्हापशाला गायलो मी. तात्पर्य, विमान भूमितीयदृष्ट्या टेक ऑफविना थेट उभं आकाशात उडू शकत नाही. ते अगोदर गती घेतं, नंतर ४५ अंशात उडतं.

माझा वकिलीचा व्यग्र व्यवसाय असून मी अजून रियाझ, गाणं यात रमतोच. कारण ती आमच्या घराची शैली आहे. शेकडो संमेलनं (गावातील व मोठी) आम्ही पाहिली, अनुभवली. कान तयार झाला.

महासागरातील किती शिंपले वेचायचे? ‘पाव मात्रेला लय चुकली तर प्रलय होतो’, असं म्हणतात. एक स्वरकण हलला तर बेसूर होऊन जातं सगळं. तो स्वर म्हणजेच ईश्वर. त्याचा मान राखणं गरजेचं.

मला आठवण आहे, कला संस्कृती संचालनालयाने एकदा किशोरीताई आमोणकर यांची कार्यशाळा पणजीत आयोजित केली होती. मी आठवडाभर ऑफीस बंद करून उपस्थित राहिलो. किशोरीताईंकडे बोलायची, शंकांचं निरसन करून घेण्याची जी संधी मिळाली त्यातून ज्ञान मिळालं आणि चिंतनाने परीघ किती महाकाय असू शकतो याचा वेध घेता आला.

कारण पुढं साक्षात गानसरस्वती किशोरीताई बसल्या होत्या. फार मोठी पर्वणी होती ती. भैरव रागाचं कोकणीतून इतक्या सहज सुटसुटीत केलेलं विश्लेषण त्यांनीच करावं. ताईंची कोकणीसुद्धा नादमय, लयदार!

या शुद्धतेच्या अनंततेतून कुणीही ओंजळ उचलली तर ती गढूळ, अशुद्ध आणि फाल्तू होऊ शकते का? कधीच नाही. सगळेच कलाकार काही ‘मॅस्त्रो’ म्हणजे दिग्गज प्रतिभावान होत नाहीत. त्या त्या काळात ते मोजकेच दहा, बारा किंवा कमी असतात. याचा अर्थ इतर सर्व पसारा फाल्तू नव्हे.

संगीत हृदयाच्या गाभाऱ्याकडे संवाद साधतं. तसा माझा हा शब्दरूपी संवाद. वाद, युक्तिवाद, प्रतिवाद, वितंडवाद हा आमच्या व्यवसायाचा भाग. या तापाच्या ताणाच्या धबाडग्यात संगीतानं मला अपार शांती आणि शांतता दिली आहे. गोरख मांद्रेकर यांनी अनेक विद्यार्थ्यांना तबलावादनात घडवताना मी पाहिले आहे.

या विद्यार्थ्यांना घेऊन कवळ्याला निजामुद्दीन खान यांच्या तबलावादन कार्यक्रमासाठी ते आलेले असताना मी पाहिलं आहे. संगीताला अंत नसतो, तसंच या धडपडीला अंत नसतो, जीवनाची सार्थता मात्र असते. निजामुद्दीन खान यांनी जी लग्गी वाजवली ते दिव्यत्व होतं.

गोरखचे विद्यार्थी आणि मी धरून सर्व भाग्यवान असे मला वाटले. कारण पं. जितेंद्र अभिषेकी त्या लग्गीचा ज्या तर्‍हेने मनमुराद आनंद घेत होते ते दृश्य आजही डोळ्यांसमोर दिसते. इतिहास हा छापील शब्दांत बद्ध नसतो. संगीताचे सेवाव्रती उपासक साधक-सेवक ते रचतात.

गेली चार दशके मी गोव्याच्या मुख्य व इतर लहान संगीत संमेलनात उपस्थित राहतो. आज ‘सुरश्री’ धरून इतर काही संमेलनातील लोकांची उपस्थिती बघा. सातशे आसनांचं सभागृह गच्च भरून जावं म्हणून काय प्लॅन आहे? असो. संगीताची लकेर चिरशांती आणतं. विस्तारणाऱ्या जीवनात चिद्विलासी संगीत सुख आणतं. ते कवटाळूया.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sacorda: सफर गोव्याची! पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरणारे, कदंबकालीन शिवमंदिराची भक्ती करणारे 'साकोर्डा'

Iranian Warship Attack: श्रीलंकेच्या किनाऱ्यावर इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडी हल्ला, ‘IRIS डेना’ समुद्रात बुडाली; 101 कर्मचारी बेपत्ता, 78 जखमी

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

SCROLL FOR NEXT