Anant Chaturdashi Celebration  Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Anant Chaturdashi 2024 Goa: दुर्मिळ शंखाला नमस्कार ते शाळीग्रामाची पूजा; गोव्यात अनंत चतुदर्शी कशी साजरी केली जाते?

Anant Chaturdashi in Goa: अनंत चतुर्दशी गोव्यातील काही कुटुंबांद्वारे पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते

गोमन्तक डिजिटल टीम

Anant Chaturdashi Celebration in Goa

गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करताना दहा दिवस चालणाऱ्या गणेश चतुर्थीतील शेवटचा दिवस म्हणून ओळखला जाणारी अनंत चतुर्दशी गोव्यातील काही कुटुंबांद्वारे पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. ह्या कुटुंबीयांनी गोव्याच्या सामाजिक-सांस्कृतिक वारशाचे योग्य जतन करत पुढच्या पिढीला याची माहिती व्हावी यासाठी चित्रणही केले आहे.

गोव्यात जरी ही अनेक कुटुंबे 'शैव' किंवा 'शाक्त' किंवा मिश्र पद्धतीचे उपासक असले तरी, अनंत चतुर्दशी सारखा 'वैष्णव' पद्धतीचा सण साजरे करतात ही एक विशेष बाब आहे. राज्यभरातील वडिलोपार्जित कुटुंबे हा शुभ दिवस म्हणून साजरा करतात.

या दोन घरण्यांविषयी माहितीये का?

अनंत चतुर्दशी साजरी करणाऱ्या कुटुंबांपैकी दोन घराण्यांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. ती म्हणजे पणजीचे म्हामाई-कामत आणि डिचोली येथील वर्दे वालावलीकर कुटुंबे. वर्दे वालावलीकर हे मूळ तिसवाडी तालुक्यातील सांत इस्तेवे बेट येथील रहिवासी.

Anant Charturdashi at Kamat Mhamai residence in Panaji

पोर्तुगीजांकडून होणारा धार्मिक छळ टाळण्यासाठी त्यांचे फोंडा, सांगे आणि डिचोली येथे स्थलांतरित झाले. पण ही उपासना पद्धती कायम राहिली ती डिचोली येथे राहणाऱ्या कुटुंबाकडे.

ह्या वर्दे वालावलीकर कुटुंबाचे २०० वर्षांचे वडिलोपार्जित घर हे सुप्रसिद्ध कोकणी नायक, शणै गोंयबाब (वामन रघुनाथ शेणवी वर्दे वालावलीकर) यांचे ही हे जन्मस्थान आहे.

गोव्यात अनंत चतुर्दशीला पुजा कशी केली जाते?

ह्या दिवशी इतरत्र गेलेले सगळे कुटुंबातील घटक वडिलोपार्जित घराघरात अनंतचा सण साजरा करण्यासाठी येतात. त्यावेळी ते अनंताच्या (भगवान विष्णू) शाळीग्रामाची पूजा करतात. ते करत असताना, विष्णूची वेग-वेगळी लांच्छने (चिन्न) यांचा पण सहभाग असतो, ज्यात प्रामुख्याने दर्भाचा सात-फणी शेष, कलश आणि शंखाचा समावेश असतो.

Anant Chaturdashi Goa

अनंतची उपासना करण्यासाठी भगवान विष्णूचे एक रूप, म्हणजे सात-फणी शेषाचे प्रतीकात्मक प्रतिनिधित्व केले जाते, ज्यामध्ये १४ गाठींचा एक पवित्र धागा असतो. कलश हे क्षीरसागराचे प्रतीक आहे.

अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने 'अन्नसंतर्पण' आयोजित केले जाते जेथे विशेष शाकाहारी पाककृती दिल्या जातात.

पणजीमध्ये म्हामाई कामत वडिलोपार्जित उत्सव सुप्रसिद्ध आहेत आणि शेकडो लोक विष्णू आणि दुर्मिळ शंखाला नमस्कार करण्यासाठी गर्दी करतात.

म्हामाई कामत घराण्याच्या 'कासा दोस म्हामाईस' या ऐतिहासिक घरामध्ये हा सण साजरा केला जातो. पणजीतील जुन्या सचिवालयाजवळील ह्या घराला २३ खोल्या आणि दोन अंतर्गत अंगणांचा तीनशे वर्षांहून अधिक प्राचीन इतिहास आहे. म्हणून पोर्तुगीजांच्या काळा पासून चालू असलेल्या या उत्सवाला 'कोंग्याचे फेस्त' असेही म्हणत.

Anant Chaturthi Celebration

या दिवशी उजव्या बाजूच्या शंखाची, त्याच्या प्रकारातील दुर्मिळ नमुन्याची, पूजा केली जाते. कुटुंबाने हा सण कधी साजरा करायला सुरुवात केली, हे कुटुंबातील कोणालाही माहिती नाही. परंतु एका नोंदीनुसार असे उघड झाले आहे की पवित्र शंख या कुटुंबा कडे १८६४ मध्ये आला.

हा शंख आता त्यांच्या देवघरात सोन्याने सजवलेल्या आणि हिरे आणि माणिकांनी मढवलेला आहे. वर्षातून एकदा (अनंत चतुर्दशीला) सार्वजनिक पूजेसाठी काढले जाते. ह्या दिवशी अभ्यागत, मित्र आणि नातेवाईक यांचा सतत प्रवाह असतो.

अनंत चतुर्दशी व्रत (Anant Chaturdashi Vrat In Goa)

अनंत चतुर्दशीच्या संपूर्ण रात्रभर भक्त जागृत राहतात आणि विष्णु सहस्रनाम, विष्णू स्तोत्रे आणि श्लोक वाचण्यात, भजन गाण्यात आणि आरती करण्यात वेळ घालवतात. ते केवळ दुसऱ्या दिवशी पहाटेच जेवण करतात. जे 'अनंत व्रत' पाळतात त्यांना भगवान विष्णूने समृद्धी, आनंद आणि यशाचा आशीर्वाद दिला असल्याचे म्हटले जाते.

Anant Chaturdashi

गोव्यात, 'अनंत चतुर्दशी व्रत' बहुतेक ब्राह्मण आणि सारस्वत ब्राह्मण कुटुंबे पाळतात. तर सांखळी येथील जावडेकर कुटुंब, खांडेपार-फोंडा येथील गोबरे कुटुंब, उंडीर-बांदोडा, फोंडा येथील बखले कुटुंब, पाणीवाडा-बोरी येथील बोरकर कुटुंब, प्रियोळ-फोंडा येथील देसाई कुटुंब, आणि राज्यातील विविध ठिकाणी असलेली कामत, सरदेसाई कुटुंबे हे देखील अनंत चतुर्दशी साजरी करतात. (Photos courtesy: Photos courtesy: @SKamatMhamai1 and Nitin Bakhale)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

Farmagudi Accident: फार्मागुडी येथे कार आणि दुचाकीचा अपघात, महिला जखमी

SCROLL FOR NEXT