Volodymyr Zelenskyy Dainik Gomantak
ग्लोबल

Volodymyr Zelenskyy: ब्रिटनच्या 900 वर्षे जुन्या वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये झेलेन्स्की यांनी केले भाषण, जग ऐकतच राहिले...

Britain: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की युद्धाला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी ब्रिटनच्या दौऱ्यावर लंडनला पोहोचले आहेत.

Manish Jadhav

Volodymyr Zelenskyy: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की युद्धाला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी ब्रिटनच्या दौऱ्यावर लंडनला पोहोचले आहेत.

तिथे त्यांनी ब्रिटनच्या 900 वर्षे जुन्या वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये युक्रेनमधील युद्धाच्या परिस्थितीवर बोलण्यास सुरुवात केली, तेव्हा केवळ ब्रिटीश खासदारच नाही, तर संपूर्ण जग त्यांना ऐकत राहिले. (Russia-Ukraine war)

दरम्यान, ब्रिटिश खासदारांना संबोधित करताना झेलेन्स्की यांनी पहिल्या दिवसापासून रशियन आक्रमणाविरोधात पाठिंबा दिल्याबद्दल ब्रिटिश जनतेचे आभार मानले.

अधिक समर्थन मिळविण्यासाठी ते त्यांच्या देशाबाहेर प्रवास करत आहे. युक्रेनियन सैन्याचे आभार मानताना झेलेन्स्की म्हणाले की, “शूर सैनिकांच्या वतीने मी इथे आलो आहे.''

दुसरीकडे, लंडन (London) पहिल्या दिवसापासून कीवसोबत आहे. झेलेन्स्की यांचे भाषण ऐकण्यासाठी शेकडो खासदार आणि संसदीय कर्मचाऱ्यांनी 900 वर्षे जुना वेस्टमिन्स्टर हॉल खचाखच भरला होता.

जवळपास एक वर्षापूर्वी रशियाच्या (Russia) आक्रमणानंतर युक्रेनबाहेरचा हा त्यांचा दुसरा दौरा आहे. झेलेन्स्की यांनी डिसेंबरमध्ये अमेरिकेला भेट दिली होती.

पंतप्रधान ऋषी सुनक यांनी झेलेन्स्की यांना मिठी मारली

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष बुधवारी रॉयल एअर फोर्सच्या विमानाने लंडनला पोहोचले. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांचे स्वागत केले. झेलेन्स्की म्हणाले की, "युक्रेनच्या मदतीसाठी आलेल्या पहिल्या देशांपैकी ब्रिटन एक होता. आज मी लंडनमध्ये आहे. ब्रिटिश लोकांच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानायला हवेत."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar 2026: नशिबाची साथ अन् अफाट पैसा! शुक्राचा स्वतःच्याच नक्षत्रात महाप्रवेश! 'या' 5 राशींचे नशीब पालटणार; राजासारखे जीवन जगणार

Droupadi Murmu: श्री जगन्नाथ दर्शनार्थ पुरीच्या विशाल पथावर...

खरी कुजबुज: उच्चशिक्षितही फसतात

Goa Investigation: सॅम्युअल ब्रागांझा मृत्यू प्रकरणाचा तपास अद्याप रखडलेलाच; आत्महत्येच्या प्राथमिक संशयानंतरही पडद्यामागचे गूढ वाढेना

NSUI: बालरथांचे 'सुरक्षा ऑडिट' करावे! 'एनएसयूआय' आक्रमक, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको

SCROLL FOR NEXT