China Dainik Gomantak
ग्लोबल

चीनमध्ये वायू प्रदूषणामुळे यलो अलर्ट जारी, महामार्ग आणि क्रिडा मैदाने केली बंद

कोळशाच्या उत्पादनावर मर्यादा आणल्यानंतर आणि आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेत आपल्या पर्यावरणीय रेकॉर्डवर टीका झाल्यानंतर चीनने (China) हे पाऊल उचलले आहे.

दैनिक गोमन्तक

अत्यंत घातक वायू प्रदूषणामुळे (Air Pollution) चीनने शुक्रवारी सर्व महामार्ग आणि शाळेची मैदाने बंद केली. कोळशाच्या उत्पादनावर मर्यादा आणल्यानंतर आणि आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेत आपल्या पर्यावरणीय रेकॉर्डवर टीका झाल्यानंतर चीनने हे पाऊल उचलले आहे. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, बीजिंगच्या नगरपालिका-स्तरीय सरकारने अत्यधिक वायू प्रदूषणामुळे यलो अलर्ट जारी केला आहे.

गुरुवारी दुपारी चार वाजल्यापासून हा नियम लागू करण्यात आला. चीनमधील (China) सर्वात गंभीर वायू प्रदूषणासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तो अनुक्रमे ब्लू, येलो आणि आरेंज रंगात प्रथम येतो. चीनच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बीजिंग (Beijing) आणि आजूबाजूच्या परिसरात बुधवार ते शनिवारपर्यंत हवेचे प्रदूषण खूप वाढणार आहे. शुक्रवारी, चीनच्या उत्तरेकडील भागात धुराने भरलेल्या धुक्याने आकाश व्यापले. यामुळे दृश्यमानता 200 मीटरपेक्षा कमी झाली.

कोळशाच्या उत्पादनात दहा लाख टनांहून अधिक वाढ झाली

या आठवड्याच्या सुरुवातीला, चीनने सांगितले की, आम्ही नियमित कोळसा उत्पादन एक दशलक्ष टनांपेक्षा जास्त वाढवले आहे. जेणेकरुन विजेची कमतरता भासणार नाही. किंबहुना, अलीकडच्या काही महिन्यांत वीज संकटाचा सामना करणाऱ्या चीनला वीज पुरवठ्याअभावी आपले कारखाने बंद करावे लागले होते.

जगातील सर्वात मोठा हरितगृह वायू उत्सर्जक

बँकॉक पोस्टनुसार, चीनच्या शहर प्राधिकरणाच्या हवामान खात्याने हवेतील वाढत्या प्रदुषाणासाठी असामान्य हवामानाच्या स्थितीस जबाबदार ठरले आहे. तर चीन हा जगातील सर्वात मोठा हरितगृह वायू उत्सर्जित करणारा देश मानला जातो. येथील बहुतांश उद्योग कोळशावर अवलंबून असल्याने कार्बन उत्सर्जन सर्वाधिक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT