China: Xi Jinping  Dainik Gomantak
ग्लोबल

Xi Jinping: जिनपिंग तिसऱ्यांदा बनणार चीनचे राष्ट्राध्यक्ष

जगासाठी ठरणार डोकेदुखी; दक्षिण कोरिया, जपान, हाँगकाँग, अमेरिका चिंतेत

गोमन्तक डिजिटल टीम

Xi Jinping: क्षी जिनपिंग हे तिसऱ्यांदा चिनचे राष्ट्राध्यक्ष बनण्याची तयारी करत आहेत. चिनच्या कम्युनिस्ट पक्षाचे 20 व्या अधिवेशनास 16 ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली आहे. 22-23 ऑक्टोबर रोजी क्षी जिनपिंग यांना अधिकृतरित्या तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित केले जाण्याची शक्यता आहे.

तथापि, जिनपिंग यांच्या या सत्तेवरील पकडीने जगाच्या चिंतेच आणखी वाढ होणार आहे. जिनपिंग यांच्या तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याने अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग ही राष्ट्रे तणावात असणार आहेत. कारण त्यामुळे चीनशी संबंधित अनेक मुद्यांवर चीन अधिक आक्रमक होण्याचा धोका आहे.

दक्षिण चीन समुद्र

दक्षिण चीन समुद्रात २५० लहानमोठी बेटे आहेत. महत्वाचा व्यापारी मार्ग असलेल्या या समुद्रावर चिनला संपुर्ण वर्चस्व हवे आहे. येथून वर्षाला जवळपास साडे तीन ट्रिलयन डॉलरचा व्यापार होतो. आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या असलेल्या या समुद्रावर जिनपिंग त्यांचा दावा आणखी बळकट करू शकतात. चीनने या समुद्रात आधीच अनेक कायदे धुडकावत घेराबंदी सुरू केली आहे.

तैवानचा प्रश्न चिघळणार

जिनपिंग यांच्या नेतृत्वामुळे चीन आणि तैवानमधील तणाव आणखी वाढू शकतो. युक्रेन युद्धानंतर चीन आक्रमक होत चालला आहे. तैवानच्या सीमेत अनेकदा चिनी लढाऊ विमाने घुसखोरी करून जात असतात. चिनची रेड आर्मी तैवानवर लष्करी कारवाई करू शकते.

एलएसीवर तणाव वाढण्याची शक्यता

चीनमध्ये सत्ता म्हणजे जिनपिंग असे समीकरण आहे. त्यामुळे जिनपिंग पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्याने शेजारील राष्ट्रांच्या सीमेवर चिनची दादागिरी वाढू शकते. भारत-चीनच्या एलएसी सीमेवर 40 वर्षात प्रथमच हिंसक झटापट झाली होती. याशिवाय अरूणाचल प्रदेशातही चिनच्या कारवाया सतत सुरू असतात. त्यामुळे भारतासाठीही चीनचा धोका वाढू शकतो.

विरोधकांचे दमन

जिनपिंग यांच्या सत्तेवरील पकडीने खुद्द चीनमध्येही असंतोष आहे. जिनपिंग विरोधात राजधानी बीजिंगमध्ये विरोधही झाला आहे. तसेच चिनी कम्युनिस्ट पक्षात बंडखोरी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. विरोधकांची धऱपकड सुरू करण्यात आली असून क्रांतीचे नेतृत्व करणाऱ्यांची अकाऊंट्स ब्लॉक केली गेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT