Twitter To X Dainik Gomantak
ग्लोबल

X Twitter Down: भारतात 'एक्स' डाउन? जाणून घ्या नेमंक काय झालं

X Twitter Down: अब्जाधीश एलन मस्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) ची सेवा भारतात विस्कळीत झाली. वापरकर्त्यांना X वर ट्विट पाहण्यात आणि पोस्ट करण्यात समस्या येत आहेत.

Manish Jadhav

X Twitter Down: एलन मस्क यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) ची सेवा भारतात विस्कळीत झाली आहे. वापरकर्त्यांना X वर ट्विट पाहण्यात आणि पोस्ट करण्यात समस्या येत आहेत. डाउन डिटेक्टरने देखील याबाबत समस्या येत असल्याची पुष्टी केली आहे. एक्स कॉर्पमधील समस्यांबाबत डाउन डिटेक्टरवर सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. अनेक वापरकर्ते X सेवांच्या व्यत्ययाबद्दल तक्रार करत आहेत. आम्हाला X वापरण्यास त्रास होत आहे. पेज रिफ्रेश केल्यावर, अकाऊंट आपोआप लॉग आउट होत असून एररही दिसत असल्याची तक्रार वापरकर्ते करतायेत.

दरम्यान, डाउन डिटेक्टरवरही एक्स कॉर्प आउटेजच्या तक्रारी वाढत आहेत. वापरकर्त्यांना टाइमलाइन पाहण्यातही समस्यांचा सामना करावा लागत आहे. सुमारे 57% लोकांना सर्व्हर कनेक्शनमुळे समस्या येत आहेत, 36% वापरकर्त्यांनी X ॲपसह समस्या नोंदवल्या आहेत तर सुमारे 7% लोकांनी नोंदवले आहे की, ते मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर लॉग इन करु शकत नाहीत.

आउटेज ट्रॅकर्सच्या लाइव्ह आउटेज मॅपनुसार, X वापरकर्त्यांना दिल्ली, जयपूर, लखनऊ, कटक, अहमदाबाद, बंगळुरु, हैदराबाद सारख्या शहरांमध्ये सर्वात जास्त समस्यांचा सामना करावा लागला आहे.

यापूर्वी, X ला डिसेंबर 2023 मध्ये मोठ्या अडथळ्याचा सामना करावा लागला होता. त्या काळात हे प्लॅटफॉर्म जगभरातील वापरकर्त्यांसाठी बंद करण्यात आले होते. परंतु हे का घडले याबाबत X ने कोणतेही स्पष्टीकरण दिले नव्हते. त्यानंतर काही तासांतच सेवा पुन्हा सुरु करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: बीचवरुन बेपत्ता झाला 9 वर्षाचा परदेशी पर्यटक, गोवा पोलिसांनी पुन्हा घडवली कझाकस्तानच्या मायलेकांची भेट

Goa Today's Live News: पंतप्रधानांचा सुरक्षा प्रभारी असल्याची तोतयागिरी केल्याप्रकरणी शिरंग जावळ विरोधात तक्रार दाखल

Antarctic Climate Change: अंटार्क्टिका किनारपट्टीतील हवामान बदलाचा होणार अभ्यास, गोव्यातून सात संशोधक घेणार सहभाग

Sadye: बहुमजली तसेच जलतरण प्रकल्पांना पाणीपुरवठा बंद करा! सडये ग्रामस्थांची मागणी; सामूहिक शेतीला देणार प्राधान्य

Poinguinim: गालजीबाग, तळपण नदीप्रदूषणावरुन कारवाईची मागणी! पैंगीण ग्रामसभेत मेगा प्रकल्पांना विरोध

SCROLL FOR NEXT