Monkeys Dainik Gomantak
ग्लोबल

'अरे बाबांनो, मंकीपॉक्सच्या प्रादुर्भावाला माकडं जबाबदार नाहीत'; WHO केलं स्पष्ट

WHO: कोरोनानंतर आता मंकिपॉक्सच्या प्रादुर्भावाने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.

दैनिक गोमन्तक

Monkeypox: कोरोनानंतर आता मंकिपॉक्सच्या प्रादुर्भावाने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. यातच आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे की, 'मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव माकडांशी संबंधित नाही.' ब्राझीलमध्ये माकडांच्या वाढत्या हल्ल्यानंतर WHO ला हे स्पष्टीकरण द्यावे लागले. ब्राझील सध्या मंकीपॉक्सने सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांपैकी एक आहे, जिथे एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आहे. मंकीपॉक्समुळे स्पेन आणि भारतात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मार्गारेट हॅरिस यांनी जिनिव्हा येथे सांगितले की, 'मंकीपॉक्सच्या प्रसारासाठी माकडांना जबाबदार धरता येणार नाही. लोकांना हे माहित असणे आवश्यकआहे की, विषाणूचा प्रसार मानवांमध्ये होत आहे.' डब्ल्यूएचओचे वक्तव्य ब्राझिलियन न्यूज वेबसाइट G1 ने दिलेल्या अहवालानंतर आले आहे. साओ पाउलो राज्यातील सो जोस डो रिओ प्रेटो शहरात एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत 10 माकडांना विषबाधा झाली आहे.

'मंकीपॉक्स प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरु शकतो'

ब्राझीलच्या (Brazil) इतर भागांतूनही अशाच घटना समोर येत आहेत. हॅरिस पुढे म्हणाले की, 'मंकीपॉक्स विषाणू प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरु शकतो, परंतु सध्यातरी हा संसर्ग माणसापासून माणसापर्यंतच मर्यादित आहे. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपण काय करु शकतो याचा विचार सर्वांनी केला पाहिजे.'

दुसरीकडे, गेल्या महिन्यात डब्ल्यूएचओने (WHO) युरोप आणि यूएसमधील (USA) वाढत्या मंकीपॉक्स (Monkeypox) रुग्णांच्या संख्येमुळे जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली होती. पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशनने गेल्या आठवड्यात सांगितले की, ब्राझील, युनायटेड स्टेट्स आणि कॅनडा हे यूएसमधील मंकीपॉक्सच्या प्रादुर्भावामुळे सर्वाधिक प्रभावित झालेले प्रदेश आहेत, ज्यात 5,000 हून अधिक रुग्णंची नोंद झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT