Saudi Arabia: महिलांच्या हक्कांबाबत अत्यंत कठोर असलेल्या सौदी अरेबियाने ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. सौदी सरकारने दोन महिलांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी देशाची पुराणमतवादी प्रतिमा बदलण्याच्या निर्णयात दोन महिलांना सरकारमधील वरिष्ठ पदांवर नियुक्त केले आहे.
खरं तर, सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) सरकारने रविवारी जारी केलेल्या डिक्रीमध्ये शिहाना अलजाज यांना सौदी मंत्रिमंडळाच्या पहिल्या महिला उपमहासचिव म्हणून नियुक्त केले आहे. त्याचबरोबर हैफा बिंत मोहम्मद अल सौद यांची पर्यटन उपमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अहवालानुसार, सौदी सरकारला (Government) कर्मचाऱ्यांमध्ये वैविध्य आणायचे आहे. सौदी अरेबिया हळूहळू महिलांवरील निर्बंध शिथिल करत आहे.
तथापि, एका आकडेवारीनुसार, देशात महिला बेरोजगारीचे (Unemployment) प्रमाण अजूनही पुरुष नागरिकांच्या तुलनेत चौपट आहे. असे असताना सौदी सरकार नियमांमध्ये शिथिलता आणत आहे. महिला आता घराबाहेर पडून काम करु लागल्या आहेत. विशेष म्हणजे, त्या बुरखा आणि हिजाबशिवाय देशातील रस्त्यांवर फिरु शकतात.
दुसरीकडे, सौदी क्राउन प्रिन्स आपल्या महत्त्वाकांक्षी 'व्हिजन 2030' चा भाग म्हणून देशाच्या पुराणमतवादी प्रतिमेचा त्याग करुन परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना सौदीच्या अर्थव्यवस्थेचे तेलावरील अवलंबित्व कमी करायचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.