Earth & Solar storms Dainik Gomantak
ग्लोबल

पृथ्वीवर धडकणाऱ्या सौर वादळामुळे इंटरनेट बंद पडणार ?

सुर्याकडून(Sun) पृथ्वीकडे येणारी ऊर्जा जास्त असते. जितकी जास्त ऊर्जा तितके जास्त सौर डाग, तेवढेच जास्त सौर वादळे.

दैनिक गोमन्तक

पृथ्वीवरील आतापर्यंत सर्वात मोठे सौर वादळ हे 1859 ते 1921 या काळात आले होते. या काळात संदेशवहन नव्हते, मग इंटरनेट तर नाहीच नाही.

पूर्वानुमान करता न येऊ शकणाऱ्या सौर वादळामुळे इंटरनेटची (Internet)सेवा ही काही दिवसांपासून ते काही महिन्यांपर्यंत बंद पडू शकते का असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सौर वादळे शक्यतो 100 वर्षातून एकदाच येत असतात. पण त्यामुळे इंटरनेटसंबंधीच्या सुविधा ह्या उखडून टाकल्या जाऊ शकतात आणि त्या बंद पडतील असे एका अहवालात सांगण्यात आले आहे.

संगिता ज्योती (Sangita Jyoti)या कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये (University of California)असिस्टंट प्रोफेसर आहेत. त्यांनी हा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल SIGCOMM (Association for Computing Machinery's Special Interest Group on Data Communications) 2021 मध्ये सादर करण्यात आला आहे.

संगिता ज्योती यांनी मांडलेल्या संशोधनानुसार येणाऱ्या काळात सौर वादळामुळे इंटरनेट व्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. इंटरनेट अनेक दिवस किंवा अनेक महिने ही बंद पडू शकते. महत्वाचे म्हणजे येणाऱ्या सौरवादळाचे पूर्वानुमान लावता येणं फार अवघड आहे. हे सौरवादळ पृथ्वीवर धडकणार आहे. याचे पूर्वानुमान जर लावायचे असेल तर ते केवळ एखादा दिवस आधी लावता येऊ शकते असेही त्यामध्ये सांगितले आहे.

इंटरनेटचे जाळे निर्माण करण्यासाठी समुद्रातून केबल टाकण्यात आलेल्या आहेत. जर 19 व्या शतकात ज्या क्षमतेचे सौर वादळ आले होते. त्याच क्षमतेचे सौर वादळ आता जर आले तर या सर्व केबल्स निकामी होऊ शकतात. परंतु इंटरनेट संबंधीच्या सुविधांचा विकास करण्यासाठी वापरण्यात आलेले सर्व साधने ही जास्त क्षमतेची नाहीत. त्यामुळे या येणाऱ्या सौरवादळात इंटरनेट संबंधीची सर्व साधने निकामी होऊ शकतात असेही या अहवालात सांगण्यात आले आहे

कसे असेल सौर वादळ ?

सौर वादळ हे सूर्यामधील चुंबकीय (Magnetic)क्षेत्रातील अनियमिततेमुळे तयार होणारे वादळ असते. सूर्यावर दिसणारे डाग हे मोठे होत असतात. सूर्याचे चुंबकीय क्षेत्र जेव्हा मोठ्या प्रमाणात असते तेव्हा सौर डागांची संख्या वाढत जाते. मोठे झालेल्या या डागाच्या ठिकाणी कालांतराने विस्फोट होतो आणि सौरवादळे निर्माण होतात.

मानवी शरीरावर होणार सौर वादळाचा परिणाम :

सौर वादळे सूर्याच्या पृष्ठभागावर निर्माण होतात. त्यानंतर त्याच्या लहरी बाहेर सर्वत्र फेकल्या जातात. त्यामुळे पृथ्वीवरील संदेशवहन, वीजपुरवठा (Power supply)निकामी करण्याची ताकद सौरवादळांमध्ये असते. या लहरीच्या मार्गात जर पृथ्वी आली तर त्याचे परिणाम पृथ्वीवर ही होतात. जितके जास्त सौर डाग, तितकी जास्त सौर वादळे येतील. सुर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा जास्त असते असे म्हणता येईल. त्यामुळे त्यांना विश्वकिरण असेही म्हणतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT