RAISI.jpg 
ग्लोबल

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भेटणार नाही- इब्राहिम रइसी

गोमंन्तक वृत्तसेवा

दुबई : अमेरिकेचे निवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांना आपण भेटणार नाही, तसेच इराणच्या (Iran) आंतरखंडीय क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि क्षेत्रीय नागरी सेनेला त्यांचा असलेला पाठिंबा याच्या बाबत कोणत्याही स्वरुपाची वाटाघाटी करणार नाही, असे इराणचे नवनिर्वाचित अध्यक्ष इब्राहिम रइसी(Ibrahim Raisi) यांनी सोमवारी सांगितले आहे. मागील आठवड्यातील प्रचंड बहुमताने रइसी  विजयी झाल्यानंतर त्यांची कट्टरतावादी भूमिका पुन्हा एकदा  कायम असल्याचे यातून दर्शवले आहे. (Will not meet US President Ibrahim Raisi)

1988 साली जवळपास 5 हजार लोकांच्या देहदंडातील सहभागाबाबत विचारले असता, इराणच्या न्यापालिकेचे प्रमुख असलेले रइसी यांनी स्व:चे वर्णन 'मानवाधिकारांचे संरक्षक' (human rights) असे केले. इराक-इराण युध्दाच्या अखेरीस इराणी इतिहासामधील या काळ्या कालखंडाबाबत त्यांना प्रथमच दूरचित्रवाहिनीवरील थेट कार्यक्रमात जाब विचारण्यात आला आहे.

इराणविरोधातील सर्व जुलमी निर्बंध उठवण्यास अमेरिका बांधील आहे, असे इराणचे अध्यक्ष रइसी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. क्षेत्रीय नागरी सेने इराणचा आंतरखंडीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाला असलेला पाठिंबा याबद्दल विचारले असता हे मुद्दे 'कोणत्याही प्रकारची तडजोड होण्यासारखे नाहीत' असे उत्तर रइसी यांनी यावेळी दिले.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cipla Share Price: सिप्लाच्या गोव्यातील प्लांटला Good Tag; कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्के वाढ

Diwali 2024: उधळण आनंदाची! तेजोमय दिव्यांना बहरलेला 'दिपोत्सव'

Goa Monsoon 2024: पेडणे, सत्तरी, डिचोलीत ढगाळ वातावरण; तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता

VIDEO: धक्कादायक! मोकाट कुत्र्याच्या शेपटीला बांधून तरुणाने फोडले फटाके; व्हिडिओ व्हायरल

Suyash Prabhudesai: पायाच्या दुखापतीनं केला घात! मिझोरामविरुद्धच्या सामन्याला गोव्याचा स्टार मुकणार

SCROLL FOR NEXT