Perfumes Not Allowed In Flights: काही लोक घामाचा वास टाळण्यासाठी आणि सुगंधी वास येण्यासाठी परफ्यूम किंवा डिओडरंट वापरतात. दुर्गंधीपासून सुटका मिळण्यासोबतच मूड फ्रेश राहतो आणि आत्मविश्वासही वाढतो.
परफ्यूम आणि डिओडरंटचे फायदे आहेत. पण तुम्ही ते विमानात घेऊन जाउ शकत नाही हे तुम्हाला माहीती आहे का? अशावेळी तुमच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो की विमान कंपन्या विमानात नेण्यास परवानगी न देणार्या परफ्यूममध्ये असे काय असते? या मागचे कारण आज जाणून घेउया.
जगभरातील सर्व विमान कंपन्या इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने बनवलेले नियम पाळतात. या नियमांनुसार विमानात दुर्गंधीनाशक आणि परफ्यूम आणण्यास मनाई आहे.
यामागील अनेक कारणे
अनेक विमान कंपन्यांच्या वेबसाईटवर हे देखील स्पष्टपणे लिहिलेले आहे की प्रवासी त्यांच्या सामानाच्या बॅगेजमध्ये किंवा चेक-इन बॅगेजमध्ये परफ्यूम ठेवू शकत नाहीत. पण किती प्रमाणात परफ्यूम नेण्यास परवानगी आहे. हेही येथे सविस्तरपणे सांगण्यात आले आहे. विमानात परफ्यूम किंवा डिओडरंट न नेण्यामागे अनेक कारणे आहेत.
ज्वलनशीलता
परफ्यूम, डिओडरंट्समध्ये अल्कोहोल असते. हे ज्वलनशील असल्याने आग लागण्याची भाती असते. यामुळे आग आणखी भडकू शकते आणि ती विझवणे अधिक कठीण होते.
घातक साहित्य
परफ्यूम इत्यादींमध्ये प्रोपेलेंट्स आणि सॉल्व्हेंट्ससारखे अनेक धोकादायक घटक देखील असू शकतात. श्वास घेतल्यास किंवा त्वचेच्या संपर्कात असल्यास अशी सामग्री काही लोकांसाठी हानिकारक असू शकते.
ऍलर्जी
काही लोकांना परफ्यूमची अॅलर्जी असते. अशा परिस्थितीत, विमानात उपस्थित असलेल्या कोणत्याही ऍलर्जी व्यक्तीला परफ्यूममुळे शिंकणे, खोकला आणि घरघर यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
त्यांचा तीव्र वास
परफ्यूम जास्त शक्तिशाली असू शकतात आणि त्यांचा तीव्र सुगंध इतर प्रवाशांना त्रासदायक ठरू शकतो. विमानासारख्या बंद ठिकाणी ते लवकर पसरू शकते आणि लोकांना त्रास देऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.