Adar Poonawalla Dainik Gomantak
ग्लोबल

ग्रीन पास यादीत कोविशील्ड का नाही?; EMA ने सांगितलं कारण

दैनिक गोमन्तक

कोविशील्ड लस (Covishield vaccine) घेऊन युरोपमध्ये (Europe) जाणाऱ्या भारतीयांसमोर (Indian) मोठं संकट निर्माण झाले आहे. त्याचं कारण म्हणजे भारतामध्ये मोठ्याप्रमाणात कोरोना लसीकरणासाठी (Vaccination) वापरल्या जात असलेल्या कोविशील्ड लसीला युरोपीयन युनियनने (European Union) मंजूरी दिलेली नाही. त्यामुळे ग्रीन पास मिळणे कठीण झाले असून, भारतामधून युरोपात जाणास आता समस्या निर्माण होणार आहेत. यासंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute) मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी मात्र दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे युरोपीयन मेडिसिन एजन्सी अर्थात EMA ने कोविशील्ड लसीला ग्रीन पास (Green Pass) यादीत समावेश नसल्याचा खुलासा केला आहे.

ग्रीन पीस पध्दती युरोपीयन युनियनने सुरु केली आहे. यामध्ये युरोपीयन युनियनच्या युरोपियन मेडिसिन एजन्सीने (European Medicine Agency) काही कोरोना लसींना मान्यता मंजूरी दिली आहे. मंजूरी दिलेली कोरोनाची लस प्रवाशांनी घेतलेली असेल तरच युरोपमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असणारा ग्रीन पास देण्यात येणार आहे. हा ग्रीन पास मिळाल्यानंतर ती व्यक्ती युरोप खंडातील 27 देशांमध्ये जाऊ शकते. 1 जुलैपासून ही ग्रीन पास पध्दती संपूर्ण युरोपात लागू केली जाणार आहे. तर जर्मनी, स्पेन, पोलंड आदी देशांनी याच्या अमंलबजावणीस सुरुवातही केली आहे. दरम्यान, ग्रीन पास मिळवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कोरोना लसीच्या यादीमध्ये भारतात सीरम इन्स्टिट्यूट कडून बनवण्यात आलेली कोविशील्ड लसीचा समावेशच केला नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.

युरोपियन मेडिसिन एजन्सी अर्थात EMA ने कोविशील्ड लसीचा ग्रीन पास यादीमध्ये नसण्याच्या कारणावर भाष्य केले. अॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) निर्मित कोविशील्ड लस वॅक्सझेवरियाच्याच फॉर्म्युल्याने तयार करण्यात आलेली असली तरी कोविशील्ड लसीला अद्याप युरोपीयन राष्ट्रांमध्ये परवानगी मिळालेली नाही. उत्पादन होत असलेली ठिकाणे वेगळी असल्याने अंतिम उत्पादनामध्ये काहीसा फरक फरक असू शकतो, असे युरोपीयन मेडिसिन एजन्सीचे माध्यम अधिकारी ग्रुदनिक यांनी माध्यमाला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. युरोपियन कायद्यानुसार कोरोना लसीला मान्यता मिळवण्यासाठी उत्पादन होत असलेल्या ठिकाणाा भेट देऊन लस निर्मिती प्रक्रियेची पाहणी केली जाते. कोरोना लसीला मंजूरी देण्यातील हा महत्त्वाचा भाग आहे.

काय म्हणाले आदर पुनावाला?

कोविशील्ड लस ज्या भारतीयांनी घेतली आहे, त्यांना युरोपमधील देशात प्रवास करण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्वरित हा मुद्दा सोडवण्यात येईल, अशी मी ग्वाही देतो. यासाठी नियामक आणि राजनैतिक स्तर अशा दोन्ही पातळ्यावर चर्चा केली जाईल, असे सांगत पुनावाला यांनी तात्काळ हा मुद्दा निकाली काढण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ओल्ड गोवा येथे दुचाकीच्या अपघातात 17 वर्षीय तरुण ठार, डिचोलीत गॅरेजमधील दुचाकींना आग; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Mahalaya Pitru Paksha Shraddh 2024: श्राद्ध का करावे?

Ratnagiri Crime: स्वप्न, मृतदेह! खेड, रत्नागिरी प्रकरणात नवा ट्विस्ट; आर्याचा भोस्ते घाटात होता वावर

Goa Weather Update: गोव्यात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता, दोन दिवस 'यलो अलर्ट'

Goa Blitz Chess Tournament: ब्लिट्झ फिडे बुद्धिबळ स्पर्धेत नीतिश विजेता; अपराजित राहून सर्वाधिक साडेदहा गुणांची कमाई

SCROLL FOR NEXT