Ganesh On Indonesian Currency Dainik Gomantak
ग्लोबल

Lord Ganesh On Currency: मुस्लिमबहुल इंडोनेशियात नोटेवर गणपतीचा फोटो का?

हनुमान हा इंडोनेशियाच्या लष्कराचा मॅस्कॉट; देशात मंदिरांसह अनेक भारतीय देवतांच्या मुर्ती

गोमन्तक डिजिटल टीम

Lord Ganesh On Currency: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भारतीय चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपती या देवतांचे फोटो छापावेत, अशी मागणी केली. त्यासाठी त्यांनी इंडोनेशियात २० हजारच्या नोटेवर गणपतीचा फोटो असल्याचेही सांगितले. पण मुस्लिमबहुल राष्ट्र असूनही इंडोनेशियाच्या नोटेवर गणपतीचा फोटो का आहे? याची माहिती आम्ही घेऊन आलो आहोत.

ज्या प्रमाणे भारतीय चलनाला रूपया म्हटले जाते तसेच इंडोनेशियन चलनाला रूपियाह म्हटले जाते. येथील २० हजारच्या नोटेवर गणपतीचा फोटो आहे. तसेच इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवांत्रा यांचाही फोटो आहे. नोटेच्या दुसऱ्या बाजूवर क्लासरूमचा फोटो आहे, ज्यात शिक्षक आणि विद्यार्थी दिसतात.

इंडोनेशियाच्या काही भागावर चोळ वंशीयांचे साम्राज्य होते. तेव्हा येथे अनेक मंदिरे उभारली गेली. बुद्धी, कला, विज्ञानाची देवता म्हणून गणेशाला इंडोनेशियन नोटेवर स्थान दिले गेले असावे, असा अंदाज आहे.

इंडोनेशियात ८५ टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे. आणि केवळ २ टक्के लोकसंख्या हिंदु आहे. पण तेथील नोटेवर गणपतीचा फोटो आहे. काही वर्षांपुर्वी इंडोनेशियाच्या अर्थव्यवस्थेची अवस्था अत्यंत वाईट होती. त्यामुळे तेथील अर्थतज्ज्ञांनी बराच विचार करून २० हजार रूपयांची एक नोट जारी केली आणि त्यावर गणपतीचा फोटो छापला गेला.

तेव्हापासूनच इंडोनेशियाची अर्थव्यवस्था भक्कम होत गेली, असा लोकांचा विश्वास आहे. विशेष म्हणजे, इंडोनेशियन लष्कराचे बोधचिन्ह देखील हनुमान आहे. इंडोनेशियाच्या एका सुप्रसिद्ध पर्यटनस्थळी अर्जून, श्रीकृष्ण, घटोत्कच यांच्या मुर्तीही आहेत. दरम्यान, इंडोनेशियात इस्लाम, प्रोटेस्टंट संप्रदाय, रोमन कॅथलिक, हिंदू, बौद्ध, कन्फुशियसवाद या धर्मांना मान्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

China Artificial Sun: चीन बनवणार 'आर्टिफिशियल सन'! सूर्यासारखी धगधगती ऊर्जा मुठीत; सुपरकंडक्टिंग मॅग्नेट टेस्ट यशस्वी

Youth Protest: भाजपची पोपटपंची चाललीच नाही! 'हिंदू-मुस्लिम'च्या सापळ्यात न अडकता तरुणाईचा व्यवस्थेविरुद्ध थेट एल्गार

Pakistan-Afghanistan Conflict: पाक-अफगाण सीमेवर रक्तपात! हवाई हल्ले अन् चकमकीत 500 अफगाण नागरिकांचा मृत्यू; युनायटेड नेशन्सचा धक्कादायक रिपोर्ट

Japan Earthquake: जपानमध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप! समुद्रात उसळल्या महाकाय लाटा; त्सुनामीच्या अलर्टने नागरिकांमध्ये घबराट VIDEO

Morjim CRZ Demolition: मोरजीतील भूमिपुत्रांच्या वेदना कायम! तेमवाड्यातील बांधकामांवर 6व्या दिवशीही हातोडा

SCROLL FOR NEXT