Israel Hostage Exchange Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: '1 सैनिकासाठी 1000 कैदी', इस्रायलची कमजोरी काय? हमास घेतोय फायदा!

Israel Hostage Exchange: इस्रायल आणि हमास यांच्यात मागील काही दिवसांपासून युद्ध सुरु आहे.

Manish Jadhav

Israel Hostage Exchange: इस्रायल आणि हमास यांच्यात मागील काही दिवसांपासून युद्ध सुरु आहे. हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर एकाच वेळी 5 हजारांहून अधिक रॉकेट डागले होते.

त्यानंतर अराजकतेचा फायदा घेत 1 हजारांहून अधिक दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये प्रवेश केला आणि 100 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले. हमासच्या ताब्यात असलेल्यांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत.

गाझा पट्टीतून इस्रायलमध्ये आलेल्या हमासच्या दहशतवाद्यांनी अनेक भागात नरसंहार केल्याचेही वृत्त आहे. लहान मुलांनाही जिवंत जाळण्यात आले.

अनेकांना त्यांच्या कुटुंबियांसमोर मारले गेले. दुसरीकडे मात्र, दहशतवाद्यांनी 100 हून अधिक लोकांना तुरुंगात टाकण्याचे कारण काय? याचे कारण आणि हमासची रणनीती जाणून घेऊया...

हमासने इस्रायली नागरिकांना का कैद केले?

तुम्हाला जाणून धक्का बसेल पण हे खरे आहे की, 12 वर्षांपूर्वी 2011 मध्ये इस्रायलने आपल्या एका सैनिकाच्या बदल्यात पॅलेस्टाईनच्या 1 हजारहून अधिक लोकांना सोडले होते.

त्यापैकी शेकडो लोक होते, ज्यांना दहशतवादी (Terrorist) कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे जन्मठेपेची शिक्षा झाली होती. कैद्यांच्या या देवाणघेवाणीमुळे इस्रायल आपले नागरिक आणि सैनिकांना किती महत्त्व देते हे स्पष्ट झाले. याचा फायदा आता हमासला घ्यायचा असल्याचे मानले जात आहे.

जेव्हा हमासने एका इस्रायली सैनिकाचे अपहरण केले

दरम्यान, 2006 मध्ये हमासच्या (Hamas) दहशतवाद्यांनी इस्रायली सैन्याच्या चौकीवर हल्ला केला आणि तिथून इस्त्रायली सैनिक शालितचे अपहरण केले होते.

त्यानंतर इस्रायलने शालितच्या सुटकेसाठी अनेक लष्करी कारवाया सुरु केल्या, ज्यात दहशतवाद्यांसह शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला, परंतु शालितला सोडवण्यात लष्कराला अपयश आले.

जेव्हा इस्रायलने 1 सैनिकाच्या बदल्यात 1000 कैद्यांची सुटका केली

यानंतर गाझावर सत्ता गाजवणाऱ्या हमास या दहशतवादी संघटनेने कैद्यांच्या बदल्यात कैद्यांची अदलाबदल करण्याची मागणी इस्रायलकडे मांडली, जी इस्त्रायली सरकारने सुरुवातीला नाकारली.

पण नंतर हजारो इस्रायलींनी आपल्याच सरकारवर शालितला कोणत्याही किंमतीत सोडण्यासाठी दबाव आणला. शालित संदर्भात हमास आणि इस्रायल यांच्यात चर्चा झाली नाही तर रॉन अराद सारखेच त्याचे हाल होतील, अशी भीती त्यांना होती. यानंतर इस्रायलने पॅलेस्टाईनमधील 1027 कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला होता.

हिजबुल्लाने रॉन अरादचे काय केले?

रॉन अराद हा इस्रायली हवाई दलाचा नेव्हिगेटर होता, जो 1986 मध्ये लेबनॉनमध्ये पकडला गेला होता. दक्षिण लेबनॉनमध्ये एका कारवाईदरम्यान अरादला पकडण्यात आले. प्रथम अरादला स्थानिक गटाने पकडले आणि नंतर त्याला हिजबुल्लाहच्या ताब्यात देण्यात आले.

इस्रायलने अरादला दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता पण इस्त्रायलला आपल्या मिशनमध्ये यश आले नाही.

त्यानंतर 2008 मध्ये हिजबुल्लाहने अरादचा मृत्यू झाल्याची घोषणा केली. शालीतच्या बाबतीत, शालीतची अवस्था अरादसारखी होईल अशी भीती इस्रायलींना होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Xavier Exposition: शव प्रदर्शनाला 8 दशलक्ष लोकं हजेरी लावण्याची शक्यता; गोव्यात होणार 45 दिवसांचा भावदीव्य सोहळा

Govind Gaude: मंत्री गोविंद गावडेंच्या अडचणी वाढणार? Cash For job Scam प्रकरणात कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला अटक

Goa Politics: 'कळंगुट'सोडून मायकल मांद्रेतून लढणार? 2027 च्या निवडणुकीबाबत लोबोंचे मोठं भाष्य

Antony Thattil: 15 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अडकणार लग्नबंधनात; कोण आहे कीर्तीचा करोडपती नवरा?

IFFI 2024: मडगावात यंदा इफ्फीतील चित्रपट प्रदर्शन खुल्या जागेत होणार; रवींद्र भवनच्या अध्यक्षांची माहिती

SCROLL FOR NEXT