Corona In Goa Dainik Gomantak
ग्लोबल

कोरोनाचा NB.1.8.1 व्हेरिएंट बनला धोकादायक, WHO कडून अ‍ॅडव्हायजरी जारी!

WHO COVID Variant Warning: जगात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने कहर माजवला आहे. अमेरिका, सिंगापूर, हाँगकाँग, थायलंड आणि भारतात कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. अलिकडेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली.

Manish Jadhav

जगात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने कहर माजवला आहे. अमेरिका, सिंगापूर, हाँगकाँग, थायलंड आणि भारतात कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. अलिकडेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली. अनेक देशांमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट वेगाने पसरत आहेत, ज्यामुळे लोक धास्तावले आहेत. चला तर मग जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटबाबत काय म्हटले आणि आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.

नव्या व्हेरिएंटबाबत WHO चा इशारा

WHO कडून सांगण्यात आले की, कोरोनाचे अनेक नवीन व्हेरिएंट उदयास येत आहेत. यामध्ये NB.1.8.1, JN.1 आणि KP.2 सारख्या व्हेरिएंटचा समावेश आहे, जे ओमिक्रॉनचे सब-व्हेरिएंट आहेत. NB.1.8.1 व्हेरिएंट सध्या चीन, अमेरिका आणि काही युरोपीय देशांमध्ये वेगाने पसरत आहे. त्याचवेळी, भारतासह अनेक देशांमध्ये कोरोनाच्या दोन्ही सब-व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 चे रुग्ण वेगाने वाढले आहेत. यामुळे, भारतात संसर्गात झपाट्याने वाढ नोंदवली गेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आता NB.1.8.1 ला व्हेरिएंट ऑफ मॉनिटरिंग कॅटेगरीमध्ये ठेवले आहे.

परिस्थिती नियंत्रणात

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, हा NB.1.8.1 व्हेरिएंट लोकांना खूप लवकर संक्रमित करतो, परंतु सध्या तो गंभीर आजार किंवा रुग्णालयात दाखल होण्याचे कारण ठरत नाही. तज्ञांचे मते, याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, कारण व्हेरिएंटचे रुप कधी बदलेल हे सांगता येत नाही.

भारतातील परिस्थिती काय आहे?

डॉ. जुगल किशोर यांच्या मते, 'भारतातही (India) गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये काही नवीन रुग्ण आढळले आहेत. यापैकी बहुतेक प्रकरणांमध्ये लोकांना सौम्य खोकला, ताप आणि घसा खवखवणे यासारख्या समस्या जाणवत आहेत. या आजारामुळे खूप कमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोकांमध्ये आधीच चांगली रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली आहे, त्यामुळे गंभीर लक्षणांची प्रकरणे खूप कमी आहेत. याशिवाय, बहुतेक लोकांना लसीचे डोस आणि बूस्टर डोस दोन्ही मिळाले आहेत, ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे.'

WHO चा सल्ला काय आहे?

WHO ने सर्व देशांना त्यांची देखरेख व्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक मजबूत करण्यास सांगितले आहे. चाचणी, अहवाल आणि जीनोम सिक्वेन्सिंग वाढवावे. जेणेकरुन नवीन व्हेरिएंट वेळेवर शोधता येतील. तसेच, लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देखील आरोग्य संघटनेकडून देण्यात आला.

WHO चा सल्ला

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. जर जाणे आवश्यक असेल तर मास्क घालून या ठिकाणी जावे. जेणेकरुन तुम्ही संक्रमित व्यक्तीपासून वाचू शकाल किंवा तुम्हाला कोणालाही संसर्ग होणार नाही.

नियमितपणे हात स्वच्छ करत राहा. जेव्हा तुम्ही बाहेरुन घरी याल किंवा घरी असाल तेव्हा हात स्वच्छ करत राहा.

सौम्य लक्षणे दिसल्यास चाचणी करा आणि गरज पडल्यास स्वतःला वेगळे करा.

कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेले लोक लसीचा बूस्टर डोस घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Final: तगड्या मास्टरप्लॅनची गरज! WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला पुढील 9 पैकी किती सामने जिंकावे लागणार?

Sheikh Hasina: फाशीच्या शिक्षेनंतर शेख हसीना यांना कोर्टाचा मोठा झटका, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सुनावली 21 वर्षांची शिक्षा; अवामी लीगचा राजकीय षडयंत्राचा आरोप

Goa Cabinet Decision: खाण व्यवसायाला दिलासा! ट्रकसाठी रस्ता कर सवलत आता 2027 पर्यंत वाढवली; वाचा गोवा मंत्रिमंडळाचे तीन महत्त्वाचे निर्णय

Pooja Naik: 'पूजा नाईकच्या आरोपांना पुरावा मिळेना', DGP आलोक कुमार यांचा खुलासा; प्रकरणाचा तपास थंडावणार?

अग्रलेख: गोव्यात गुन्हा करा, 'बिनधास्त पसार' व्हा! सुरक्षा यंत्रणांना जाग येण्यापूर्वीच गुन्हेगार गायब

SCROLL FOR NEXT