सध्या देशात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट (Corona Second Wave) सुरु असून, या लाटेत मोठ्याप्रमाणात रुग्णवाढ होताना दिसते आहे. त्यातच कोरोना महामारीचे हे वर्ष मागील वर्षापेक्षा जास्त धोकादायक आहे, अशी भीती आज जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) व्यक्त केली आहे. तसेच जगातील श्रीमंत देशातील लोकांनी आपल्या लहान मुलांचे लसीकरण (Vaccination )करू नये, त्या ऐवजी त्या लसी गरीब देशातील जनतेसाठी वापरता येतील असा सल्ला देखील दिला आहे. (Who advises rich countries about vaccination)
महामारीचे हे दुसरे वर्ष पहिल्या तुलनेत अधिक जीवघेणे होत जाते आहे जागतिक आरोग्य संघटनेचे महानिर्देशक ट्रेडोस अदनोम यांनी दिली आहे. शुक्रवारी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने असेही सांगितले आहे की, जगातील अनेक देशातील लोकांना आपल्या मुलांचे देखील लसीकरण करण्याची इच्छा आहे. मात्र मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी याबद्दल पुरविचार करावा आणि त्याबदल्यात या लसी कोवॅक्स कायक्रमासाठी दान कराव्या.
दरम्यान, भारतात सध्या लसीकरणासाठी सरकार सर्व पातळ्यांवर प्रयत्न करताना दिसते आहे, मात्र कोरोनाविरुद्धच्या या लढाईत लसींची कमरता भासत असल्याने मोठ्या अडचणी निर्माण होता आहेत. त्यातच आता स्पुटनिक व्ही ही रशियन लस भारतात पोहोचली असून आज या लसीचा पहिला डॉस हैद्राबाद येथे देण्यात आल्याचे समजते आहे. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या या लढाईत आता देशाला तिसरे हत्त्यार मिळाले असल्याचे म्हटले जाते आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.