Where Is Li Shangfu Dainik Gomantak
ग्लोबल

Li Shangfu: चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनंतर आता संरक्षणमंत्री गायब? दोन आठवड्यांपासून...

Where Is Li Shangfu: चीनचे परराष्ट्रमंत्री किंग गँग यांच्यानंतर आता चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू गायब झाले आहेत.

Manish Jadhav

Where Is Li Shangfu: चीनचे परराष्ट्रमंत्री किंग गँग यांच्यानंतर आता चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू गायब झाले आहेत. अमेरिकेचे जपानमधील राजदूत रेहम इमॅन्युएल यांनी X वरील एका पोस्टमध्ये हा दावा केला आहे.

आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, चीनचे संरक्षण मंत्री गेल्या दोन आठवड्यांपासून दिसत नाहीत. तिसऱ्या आफ्रिका चायना पीस अँड सिक्युरिटी फोरममध्ये ते शेवटचे सार्वजनिकरित्या दिसले होते, असा दावा केला जात आहे.

ली यांनी बीजिंग येथे आयोजित या परिषदेत आपले प्रमुख भाषण दिले होते. ली शांगफू यांची मार्च 2023 मध्ये संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

भ्रष्टाचार प्रकरणांच्या चौकशीदरम्यान ली गायब झाले

ली शांगफू अशा प्रकारे गायब झाल्याने नवीन अटकळींना तोंड फुटले आहे. पाच वर्षांपूर्वी केलेल्या हार्डवेअर खरेदीशी संबंधित भ्रष्टाचाराच्या (Corruption) प्रकरणांची चौकशी सुरु असतानाच चीनचे संरक्षण मंत्री बेपत्ता झाले आहेत.

जुलैमध्ये हा तपास सुरु करण्यात आला होता. तथापि, चिनी लष्कराचे म्हणणे आहे की, ते ऑक्टोबर 2017 पासून या मुद्द्यांचा तपास करत आहेत.

ब्लूमबर्गच्या अहवालात ली हे सप्टेंबर 2017 ते 2022 पर्यंत हार्डवेअर विभागात कार्यरत होते. मात्र, त्यांच्यावर कोणतेही आरोप नाहीत.

जिनपिंग म्हणाले - लष्कराने तयार रहावे

त्याचवेळी, चीनचे (China) संरक्षण मंत्री बेपत्ता असताना, शी जिनपिंग यांनी गेल्या रविवारी चीनच्या ईशान्य भागात केलेल्या पाहणीदरम्यान सैन्यात एकता आणि स्थिरतेची गरज व्यक्त केली होती.

ते म्हणाले होते की, एकता, सुरक्षा आणि स्थिरता राखण्यासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत. यासोबतच त्यांनी लष्कराला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आवाहनही केले.

यापूर्वी, जुलैमध्ये जिनपिंग यांनी त्यांचे परराष्ट्र मंत्री किंग गँग यांना हटवले होते. पदावरुन हटवण्‍याची घोषणा होण्‍यापूर्वी ‍किन जवळपास दोन महिने बेपत्ता होते.

यानंतर जिनपिंग यांनी वांग यी यांना नवे परराष्ट्रमंत्री बनवले. याशिवाय जिनपिंग यांनी कमांडर ली युचाओ आणि जू झोंगबो यांनाही त्यांच्या पदावरुन हटवले आहे.

अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरुन हटवल्याबद्दल शी जिनपिंग सरकारवर बरीच टीका झाली आहे. या लोकांना पदावरुन हटवल्यानंतर चीन प्रकरणावर लक्ष ठेवणाऱ्या विश्लेषकांचे म्हणणे आहे की, भ्रष्टाचारामुळे जिनपिंग यांनी ही कारवाई केली. मात्र चीनने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

चीनमध्ये प्रसिद्ध सेलिब्रिटी का गायब होतात?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सेलिब्रिटींना दिलेली वागणूक आपल्या सामर्थ्यासमोरील कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी चीन सरकारचे प्रयत्न दर्शवते.

उद्योगपतींच्या बाबतीत असे म्हटले जाते की चिनी सत्ताधारी पक्ष देशातील खाजगी उद्योगपतींच्या हातात अतिरिक्त संपत्ती स्वतःसाठी संभाव्य धोका मानतो.

राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या कार्यकाळात आणि विशेषत: गेल्या काही वर्षांत अशा लोकांना अटक करुन त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा ट्रेंड वाढला आहे. कोणीही पक्षाच्या वर नाही, असा सत्तेचा स्पष्ट संदेश असल्याचे मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT