Kailasa E-citizenship dainik gomantak
ग्लोबल

Kailasa E-citizenship: हिंदूंना मोफत मिळतेय 'कैलासा' देशाचे नागरिकत्व, नित्यानंद म्हणाले तुम्ही जर...

बलात्काराच्या आरोपावरून फरार असलेला नित्यानंद आपल्या तथाकथित देश कैलासाचे नागरिकत्व वाटप करत आहे.

Pramod Yadav

बलात्काराच्या आरोपावरून फरार असलेला नित्यानंद आपल्या तथाकथित देश कैलासाचे नागरिकत्व वाटप करत आहे. यासाठी त्याने लोकांना व्हेरिफाईड सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट शेअर करून नागरिकत्व घेण्याचे आवाहन केले जात आहे.

कैलासच्या पेजवरून मोफत नागरिकत्व घेता येईल, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, नागरिकत्व घेतल्यावर कैलासात कसे पोहोचाये आणि तिथेच स्थायिक कसे होणार? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

"तुम्ही जर हिंदू धर्माचे पालन करत असाल किंवा हिंदू विचारधारा असलेल्या गटात सामील व्हायचे असेल तर तुम्ही कैलासाचे ई-नागरिकत्व मोफत घेऊ शकता. हे घेऊन तुम्ही जागतिक हिंदू कुटुंबाचा भाग बनू शकता." असे ट्विट नित्यानंदांनी केले आहे.

कैलासाच्या अधिकृत अकाऊंटवरून नागरिकत्वाबाबत अनेक ट्विट करण्यात आले आहेत. नागरिकत्वासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक पेज उघडेल. यामध्ये पहिल्या कॉलममध्ये नाव, नंतर ई-मेल, पत्ता, शहर, राज्य, देश, व्यवसाय आणि नंतर फोन नंबर असे पर्याय आहेत. नागरिकत्व घेण्यासाठी ही सर्व माहिती मागवली जात आहे.

बलात्काराचा आरोप झाल्यानंतर नित्यानंद घाबरून देश सोडून पळून गेला. त्याला फरारी घोषित करण्यात आले. यानंतर त्यांनी दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर या देशात जाऊन जमिनीचा तुकडा विकत घेतला आणि तो आपला देश म्हणून घोषित केला. देशाला 'कैलास' असे नाव देण्यात आले.

नित्यानंद त्याला 'हिंदू राष्ट्र' म्हणतात. कैलासाच्या वेबसाईटचा दावा आहे की या देशात छळलेल्या हिंदूंना जगभरातून संरक्षण दिले जाते. येथे राहणारे हिंदू जात, लिंग असा कोणताही भेद न करता शांततेने राहतात. स्वतःची रिझर्व्ह बँक, स्वतःचे चलन आणि स्वतःचे स्वतंत्र संविधान असल्याचा दावाही कैलासा करतो.

नित्यानंद यांचा जन्म 1 जानेवारी 1978 रोजी तामिळनाडूमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अरुणाचलम आणि आईचे नाव लोकनायकी आहे. नित्यानंद यांनी 1992 मध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. 1995 मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. असा दावा केला जातो की वयाच्या 12 व्या वर्षापासून त्यांनी रामकृष्ण मठात शिक्षण घेण्यास सुरुवात केली. 1 जानेवारी 2003 रोजी नित्यानंद यांनी बंगळुरूजवळील बिदादी येथे पहिला आश्रम उघडला. त्यानंतर त्यांनी अनेक आश्रम उघडले.

2010 मध्ये नित्यानंद यांच्यावर फसवणूक आणि अश्लीलतेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची एक सेक्स सीडी समोर आली होती. या प्रकरणात नित्यानंदला अटकही झाली होती, मात्र काही दिवसांतच त्याला जामीन मिळाला. 2012 मध्ये नित्यानंद यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये पुन्हा त्याच्यावर दोन मुलींचे अपहरण करून त्यांना बंदिस्त ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

नित्यानंद 2010 मध्ये त्यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला, यावेळी ते पहिल्यांदा वादात सापडले होते. या व्हिडिओमध्ये नित्यानंद एका तमिळ अभिनेत्रीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत होते. नित्यानंद यांच्यावर अपहरण, मुलांचा बेकायदेशीर ताबा या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2019 मध्ये तो भारत सोडून फरार झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून मुलाने संपवले जीवन; उसगावात खळबळ

Rashi Bhavishya 14 November 2024: व्यवसायातून खास फायदा होईल, आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकं प्रसन्न राहतील; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Cash For Job Scam: 'मुख्यमंत्र्यांनी नोकरीत घोटाळा करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी', नरेश सावळ यांचे आवाहन

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत होणार दुर्गंधीमुक्त! पोलाद कारखाना, वृक्ष लागवडीसाठी होणार सांडपाण्‍याचा पुनर्वापर

'Cash For Job' ची दिल्लीत चर्चा! नोकर भरतीसंदर्भात श्‍वेतपत्रिका काढा; काँग्रेस सचिव शर्मा कडाडले

SCROLL FOR NEXT