Sienna Weir Death Dainik Gomantak
ग्लोबल

Sienna Weir Death: सुप्रसिद्ध ऑस्ट्रेलियन मॉडेलचा अवघ्या 23 व्या वर्षी मृत्यू; घोडेस्वारी करताना भीषण अपघात

मिस युनिव्हर्स स्पर्धेत गाठली होती अंतिम फेरी

गोमंतक ऑनलाईन टीम

Sienna Weir Death: सन 2022 ची मिस युनिव्हर्स फायनलिस्ट आणि ऑस्ट्रेलियन फॅशन मॉडेल सिएना वीएर हीने वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. घोडेस्वारी करताना तिचा भीषण अपघात झाला होता. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियात घोडेस्वारी करताना सिएनाला गंभीर दुखापत झाली होती, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

फॅशन मॉडेल सिएना वीर 2 एप्रिल रोजी विंडसर पोलो मैदानावर घोडेस्वारी करत होती. घोड्यावरील नियंत्रण सुटून ती जमिनीवर पडली. यात तिला गंभीर दुखापत झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले होते.

अनेक आठवडे ती व्हेंटिलेटरवर होती. पण डॉक्टरांना तिचे प्राण वाचविण्यात अपयश आले.सिएना वीरच्या मृत्यूची बातमी तिच्या कुटुंबीयांनी दिली. शिवाय सिएनाची मॉडेलिंग एजन्सी स्कूप मॅनेजमेंटने देखील तिच्या मृत्यूच्या बातमीला दुजारो दिला आहे.

गुरुवारी एजन्सीने तिचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, तसेच तू नेहमी आमच्या हृदयात राहाशील, अशी कॅप्शन लिहिली आहे.

सिएना वीर 2022 मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आली, जेव्हा तिने मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या 27 फायनलिस्टमध्ये स्थान मिळवले. तिने सिडनी विद्यापीठातून इंग्रजी साहित्य आणि मानसशास्त्रात दुहेरी पदवी घेतली होती. ती यूकेला जाण्याच्या विचारात होती. तिला घोडेस्वारीची खूप आवड होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BA LLB Entrance Exam: 'गोमंतक' इम्पॅक्ट! बीए एलएलबी गुणवाढ प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल, मागवला सविस्तर अहवाल; शिक्षण सचिवांना निर्देश

Goa Fake Call Center Raid: गोव्यातून अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! दोन बनावट कॉल सेंटर्सवर छापेमारी; 19 जणांना बेड्या

Mandovi River Casino: मांडवीत नवा कॅसिनो येणार की रोखला जाणार? सरकार आणि कंपनीच्या दाव्यांमधील विसंगती न्यायालयासमोर उघड; भूमिकेवरच सवाल

Karnataka Goa Island Dispute: गोव्‍याच्‍या ताब्‍यातील 16 बेटांवर कर्नाटकचा दावा! केंद्राला पत्र, सीमावाद पेटणार

Horoscope 30 April 2026: अक्षय्य तृतीयेचा सुवर्णयोग! 'या' राशींंचं पालटणार नशीब, गुंतवणुकीतून मिळणार चांगला परतावा; मेहनतीला यशाची सुवर्ण जोड

SCROLL FOR NEXT