Hijab Dainik Gomantak
ग्लोबल

Hijab And Burqa Ban: ‘या’ मुस्लिम बहुल देशात हिजाब आणि बुरखा घालण्यावर बंदी; संसदेकडून कायदा मंजूर

Tajikistan Parliament Ban on Hijab: मध्य आशियातील मुस्लिमबहुल देश असलेल्या ताजिकिस्तानच्या संसदेने हिजाब आणि बुरख्यावर बंदी घालणारा कायदा मंजूर केला आहे.

Manish Jadhav

Tajikistan Parliament Ban on Hijab: मध्य आशियातील मुस्लिमबहुल देश असलेल्या ताजिकिस्तानच्या संसदेने हिजाब आणि बुरख्यावर बंदी घालणारा कायदा मंजूर केला आहे. आता तेथील सरकार या कायद्याची अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे तिथे आराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे. सोव्हिएत युनियनपासून विभक्त झालेला ताजिकिस्तान हा एक मुस्लिमबहुल देश आहे आणि त्याची सीमा तालिबान शासित अफगाणिस्तानशी आहे. अशा परिस्थितीत शेजारील अफगाणिस्तानात बुरखा परिधान अनिवार्य असल्याने हिजाब आणि बुरखा घालण्यावर बंदी घातल्याने वाद वाढण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, ताजिकिस्तानच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृह मजलिसी मिलीने 19 जून रोजी विधेयक मंजूर केले, ज्यात ईद-उल-फित्र आणि ईद-उल-अझहा दरम्यान मुलांच्या परदेशी पोशाखावर बंदी घालण्याची तरतूद आहे. संसदेचे कनिष्ठ सभागृह मजलिसी नमोयांदगोनने 8 मे रोजीच विधेयक मंजूर केले होते. बुरखा आणि हिजाब यांसारखे परदेशी कपडे घालण्यावर बंदी घालण्याची शिफारस केली होती.

या विधेयकावरील चर्चेदरम्यान ताजिकिस्तानच्या संसदेने सांगितले की, महिलांचा चेहरा झाकणारा बुरखा हा ताजिक परंपरा किंवा संस्कृतीचा भाग नाही, त्यामुळे त्यांच्या देशात अशा विदेशी पोशाखांवर बंदी आहे. अध्यक्ष रुस्तम इमोमाली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संसदेच्या 18 व्या अधिवेशनात सांस्कृतिक पद्धती, मुलांचे संगोपन करताना शिक्षकांची भूमिका आणि पालकांची कर्तव्ये यांच्याशी संबंधित कायदेही बदलले.

आता, नवीन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मोठा दंड ठोठावण्याची तरतूदही करण्यात आली आहे. विधेयकातील तरतुदींनुसार, व्यक्तींना 7,920 सोमोनीपर्यंत दंड होऊ शकतो, तर कंपन्यांना 39,500 सोमोनीपर्यंत दंड होऊ शकतो. अधिकारी आणि धार्मिक नेत्यांना याहूनही जास्त दंडाचा सामना करावा लागू शकतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ताजिकिस्तानमध्ये लग्न आणि अंत्यसंस्काराच्या मेजवानीवरही बंदी आहे. याशिवाय, दाढी ठेवण्यावरही बंदी आहे. म्हणजे पुरुषांनी दाढी करणे आवश्यक आहे. कोणी दाढी ठेवताना दिसल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाते. तसेच, इस्लामिक पुस्तकांच्या विक्रीवरही बंदी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

Asian Games 2026: ब्लॉकबस्टर फायनल होणार! श्रीलंकेला 124 धावांनी धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश, आता जेतेपदासाठी पाकिस्तानशी होणार 'कांटे की टक्कर'

Success Motivation: 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..!'; अपयश आलं तरी थांबू नका, प्रयत्नांची साथच यशाचा मार्ग दाखवते

Mental Health Rehabilitation: मानसिक आजारावर उपचार झाले, पण पुढे काय?; रुग्णाच्या पुनर्वसनासोबत कुटुंबालाही आधाराची गरज

SCROLL FOR NEXT