Shehbaz Sharif Dainik Gomamntak
ग्लोबल

भारतासोबत 'कायम शांतता' हवी, युद्ध हा पर्याय नाही: Shehbaz Sharif

पाकिस्तानला भारतासोबत चर्चेद्वारे “शाश्वत शांतता” हवी आहे आणि काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध हा पर्याय नाही.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी म्हटले की, त्यांच्या देशाला भारतासोबत चर्चेद्वारे “शाश्वत शांतता” हवी आहे आणि काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध हा पर्याय नाही. वृत्तानुसार, हार्वर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या एका गटाला संबोधित करताना शाहबाज शरीफ म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार काश्मीर समस्येचे निराकरण या प्रदेशात कायमस्वरूपी शांततेशी निगडीत आहे. (We want permanent peace with India war is not an option Shehbaz Sharif)

पंतप्रधान शरीफ शुक्रवारी संध्याकाळी म्हणाले की, "पाकिस्तान, भागामध्ये शांतता राखण्यासाठी कटिबद्ध आहे." ते म्हणाले की, 'आम्हाला चर्चेद्वारे भारतासोबत कायमस्वरूपी शांतता हवी आहे कारण युद्ध हा कोणत्याही देशासाठी पर्याय नाहीये.' खरं तर काश्मीर प्रश्न आणि सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अनेकदा ताणले गेले आहेत.

5 ऑगस्ट 2019 रोजी, भारताने घटनेच्या कलम 370 मधील बहुतेक तरतुदी रद्द केल्यानंतर, जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर, 5 ऑगस्ट 2019 रोजी राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले होते.

जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि कायमच राहील, असे भारताने वारंवार सांगितले आहे. दहशतवाद, अस्थिरता आणि हिंसाचारापासून मुक्त वातावरणात पाकिस्तानशी सामान्य शेजारी संबंध हवे आहेत, असे भारताचे कायमच म्हणणे आहे.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शरीफ म्हणाले की, पाकिस्तान आणि भारताने व्यापार, अर्थव्यवस्था आणि त्यांच्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी स्पर्धा करायला हवी. ते म्हणाले की, पाकिस्तान आक्रमक नाही, पण त्यांची अण्वस्त्रे आणि प्रशिक्षित लष्कर हेच प्रतिबंधक आहेत. पुढे ते म्हणाले की, पाकिस्तान आपल्या सीमांच्या रक्षणासाठी लष्करावर खर्च करतो आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT