Bilawal Bhutto Dainik Gomantak
ग्लोबल

Bilawal Bhutto: आम्ही मोदी, RSS ला घाबरत नाही; भुट्टो पुन्हा बरळले...

दोन दिवसांपुर्वीच पंतप्रधान मोदींवर केली होती टीका

Akshay Nirmale

Bilawal Bhutto: पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आम्ही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) घाबरत नाही. माझे आधीचे वक्तव्य हे इतिहासाशी संबंधित होते आणि इतिहास मिटवणे अवघड असते, असेही भुट्टो म्हणाले.

दोन दिवसांपुर्वीच गुरुवारी बिलावल भुट्टो यांनी संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) ओसामा बिन लादेन तर मेला मात्र गुजरातचा कसाई अद्याप जीवंत आहे आणि तो भारताचा पंतप्रधान आहे, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी देशभरात निदर्शने केली होती. या निदर्शनांबाबत विचारल्यावर रविवारी बिलावल हे न्यूयॉर्क मध्ये पाकिस्तानी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले होते की, या असल्या निदर्शनांतून आणि आंदोलनातून पाकिस्तानला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण त्याचा काहीही फायदा होणार नाही.

मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावर भुट्टो म्हणाले की, मी भारतातील मुस्लिमांसोबत होत असलेल्या भेदभाव आणि द्वेषाबाबत बोलत होतो. त्यांच्या हक्कांविषयी बोलण्यासाठी मी तसे बोललो. त्याविरोधात आंदोलने करण्यापेक्षा द्वेष आणि भेदभावाविरोधात बोला.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी UNSC मध्ये बोलताना पाकिस्तान हे दहशतवादाचे केंद्र आहे, असे म्हटले होते. त्यानंतर भुट्टो यांनी मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर भारतीय परराष्ट्र खात्याने पाकिस्तानने स्वतःच निर्माण केलेला दहशतवाद थांबवावा, भारताकडे बोट दाखविण्याची पाकिस्तानची लायकी नाही, असे म्हटले होते. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री 16 दिसंबर 1971 चा दिवस विसरले आहेत, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. तेव्हा पाकिस्तानच्या 90 हजारहून अधिक सैनिकांना भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली होती. तेव्हा भारताच्या सहकार्यामुळे बांग्लादेश पाकिस्तानपासून स्वतंत्र झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT