Drought Dainik Gomantak
ग्लोबल

Tunisia मध्ये भीषण दुष्काळ, आता पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा द्यावा लागणार हिशोब

Tunisia: भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आफ्रिकेतील उत्तरेकडील देश ट्युनिशियाने पाण्याच्या वापरावर कडक निर्बंध लादले आहेत.

Manish Jadhav

Tunisia: भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आफ्रिकेतील उत्तरेकडील देश ट्युनिशियाने पाण्याच्या वापरावर कडक निर्बंध लादले आहेत. अल जझीराने वृत्त दिले आहे की, सरकारने पाण्याची कोटा प्रणाली सुरु केली असून शेतीसाठी पिण्यायोग्य पाण्याच्या वापरावर बंदी घातली आहे.

दरम्यान, देश येणाऱ्या संकटासाठी तयार असल्याचे सांगितले जात आहे. दुष्काळग्रस्त राष्ट्राने पाण्याच्या वापरावर अतिरिक्त कठोर निर्बंध जारी केले, ज्यात कार, सार्वजनिक ठिकाणे किंवा शेतात पिण्यायोग्य पाण्याच्या (Water) वापरावर बंदी समाविष्ट आहे.

रात्री सात तास पाणीपुरवठा बंद'

याव्यतिरिक्त, ट्युनिशियाच्या नॅशनल वॉटर यूटिलिटी सोनडे (SONEDE) नुसार, आफ्रिकन देश देशातील सर्वात वाईट दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी सात तास पाणीपुरवठा कमी करेल, असे अल जझीराने वृत्त दिले आहे. सोनडेनुसार, तात्काळ प्रभावाने दररोज रात्री 9 ते पहाटे 4 पर्यंत वॉटर कट लागू करण्यात येणार आहे.

बंदीचे उल्लंघन केल्यास तुरुंगवासही होऊ शकतो.

सलग चार वर्षे पावसाअभावी देश अभूतपूर्व दुष्काळाचा सामना करत असल्याचा दावा सोनडे नेते, मोस्बाह हलाली यांनी केला. ट्युनिशियाच्या जनतेने हा निर्णय मान्य करावा असे आवाहनही त्यांनी केले.

अल्जझीराच्या वृत्तानुसार, मोस्बाह हलालीने चेतावणी दिली की, नियमांचे उल्लंघन केल्यास दंड (Penalty) भरावा लागेल आणि तुरुंगवासाची शिक्षा देखील विचारात घेतली जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT