waren.jpg
waren.jpg 
ग्लोबल

वॉरन बफेंनी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या विश्वस्त पदाचा दिला राजीनामा

गोमंन्तक वृत्तसेवा

जगातील सर्वोत्तम गुंतवणूदार म्हणून ओळखले  जाणारे वॉरन बफे (Warren Buffett) यांनी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या (Bill and Melinda Gates Foundation) विश्वस्त पदाचा राजीनामा दिला आहे. बफे यांनी संस्थापकांच्या घटस्फोटाशी संबंधित असलेल्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी 90 वर्षीय वॉरन बफे यांनी निवेदन जाहीर करत याची घोषणा केली आहे. 65 वर्षीय बिल गेट्स फाऊंडेशनमध्ये अध्यक्ष होते. बिल आणि मेलिंडा घटस्फोटानंतरही एकत्रित काम काम करतील. तसेच फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा मेलिंडा काम पाहत आहेत. माझे पूर्णपणे लक्ष हे संस्थेच्या सुसंगत आहे असे त्यांनी जाहीर केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

तसेच बार्कशायर हॅथवेचे (Berkshire Hathaway) सगळे शेअर दान करण्यात येणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. मागील 15 वर्षात वॉरन बफे यांनी धर्मादाय संस्थांना 27 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त दान केले आहे. बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांच्या फाऊंडेशनच्या तीनही बोर्ड सदस्यांमध्ये बॉरन बफे यांचा समावेश होता. त्याशिवाय मेलिंडा आणि बिल गेट्स हेदेखील याचे सदस्य होते. मागील 27 वर्षानंतर बिल आणि मेलिंडा यांनी विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. विशेष म्हणजे वॉरन बफे आणि बिल गेट्स प्रदिर्घ काळापासून मित्र आहेत.  (Warren Buffett resigns as trustee of the Bill and Melinda Gates Foundation)

दरम्यान, मायक्रोसॉप्टचे (Microsoft) सहसंस्थापक असणाऱ्या बिल आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी 27 वर्षानंतर विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. या दोघांनीही एक संयुक्त पत्रक जाहीर करत पुढे आम्ही दोघे एकत्र राहू शकत नाही, असे स्पष्ट केले होते. 1994 मध्ये बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांचं लग्न झालं होतं. जगातील बिल गेट्स हे श्रीमंत व्यक्तीपैंकी एक आहेत. त्याशिवाय जगामधील सर्वात मोठी खाजगी संस्था बिल आणि मेलिंडा गेट्स यांच्या फाऊंडेशनमध्ये एकत्र काम सुरु ठेवणार असल्याचे दोघांनी स्पष्ट केले होते.  ''आम्ही जीवनाच्या एका नव्या टप्प्यामध्ये प्रवेश करत आहोत, अशा परिस्थितीमध्ये आम्हा दोघांनाही एकांत हवा आहे,'' असे ते यापूर्वी म्हणाले होते. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

Ponda Hospital : फोंडा इस्पितळात ऑगस्टपर्यंत सुविधा पुरवा: विजय सरदेसाई

‘’...सहमतीने संबंध ठेवणे चुकीचे म्हणता येणार नाही’’; HC ची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Labor Day 2024 : कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना कामगार दिनानिमित्त ‘लंच पॅकेट्स’

SCROLL FOR NEXT