Human Dog Dainik Gomantak
ग्लोबल

Watch Video: हजारो डॉलर्स खर्च करून जपानी व्यक्ती झाला श्वान; पहिल्यांदाच मॉर्निंग वॉकला गेला अन्...

Human Dog: कुत्रा झाल्यानंतर टॅको सकाळी पहिल्यांदा मॉर्निंग वॉकला गेला. यादरम्यान इतर कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

Ashutosh Masgaunde

Japanese Man Spends $22k To Become Human Dog:

जपानमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीने कुत्रा बनण्यासाठी 22 हजार डॉलर्स खर्च केले आणि सकाळी पहिल्यांदा मॉर्निंग वॉकला गेला. यादरम्यान इतर कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

कुत्रा झालेल्याचे नाव टॅको आहे. टॅकोचे कुत्र्यात रुपांतर करण्यासाठी महागडी शस्त्रक्रिया केली आहे. टॅकोला लहानपणापासूनच प्राणी ईच्छा आवड होती. त्यामुळे त्याने हे पाऊल उचलले.

टीव्ही जाहिराती आणि चित्रपटांसाठी पोशाख बनवणाऱ्या झेपेट या कंपनीने टॅकोसाठी कुत्र्याचा पोशाख बनवला आहे, असे लाइव्ह मिंटच्या बातमीत म्हटले आहे.

ही कंपनी शिल्पे, बॉडी सूट, 3-डी मॉडेल बनवण्यात निपुण आहे. टॅकोसाठी हा कुत्र्याचा बॉडी सूट बनवण्यासाठी कंपनीला 40 दिवस लागले आहेत.

ट्विटरवर (Twitter) 'क्युअर बोर' (@CureBore) नावाच्या अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "टॅको नावाच्या जपानमधील एका व्यक्तीने 16 हजार डॉलर खर्च करून कुत्रा बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्याने आपली ओळख मित्र, सहकारी यांच्यापासून लपवून ठेवली आहे.

29 जुलै रोजी शेअर केलेल्या क्लिपमध्ये, टॅको त्याच्या गळ्यात पट्टा घालून फिरताना दिसत आहे. त्याला एक मॉर्निंग वॉकला घेऊन जाताना दिसत आहे.

खरे तर, हा व्हिडिओ जुना आहे जो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. 5 मिनिटे 5 सेकंदांच्या या व्हिडिओला बातमी लिहिपर्यंत 2.7 मिलियन दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

त्याचबरोबर यूजर्स त्यावर कमेंट करून आपल्या विविध प्रतिक्रिया देत आहेत. एकाने विचारले की, हे कुत्रे किती वेगाने धावू शकते. दुसरा म्हणाला, आठवडाभरात याची पाठ मोडून जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT