जपान: तंत्रज्ञानाच्या विश्वात जपान जगाच्या तुलनेत नेहमीच पुढे असते. सध्या जगात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (एआय) अविष्कारांनी धुमाकूळ घातला आहे. एआयच्या आगमनाने डिजिटल विश्वात खळबळ निर्माण झाली असताना, जपानमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. ३२ वर्षीय महिलेने चक्क एआय निर्मीत नवऱ्यासोबत लग्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अलिकडे एआय संबंधित सेवा, सुविधा पुरवणारे अनेक व्यासपीठ निर्माण झाले आहेत. यात चॅट जीपीटी, गुगल जेमिनी, डीपसीक, परप्लेक्सिटी, एक्सचे ग्रॉक यासारखे विविध प्लॅटफॉर्मवरती एआय कंटेट, फोटो, व्हिडिओ यासरख्या विविध गोष्टी करुन घेतल्या जाऊ शकतात. जपानमधील या महिलेने चॅट जीपीटीचा वापर करुन एआय पार्टनर (नवरा /पती) निर्माण केला. पुढे जाऊन याच पार्टनर सोबत महिलेने लग्न केले आहे.
आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, युरिना नोगुची (३२) असे या महिलेचे नाव असून, तिच्या लग्नाची सध्या जगभरात चर्चा सुरु झाली आहे. महिलेने एआयचा वापर करुन निर्माण केलेल्या पार्टनरचे क्लाऊस असे नामकरण तिने केल्याचे समजते. क्लाऊससोबत वेळ घालवल्यानंतर त्याच्याप्रती प्रेम भावना निर्माण झाल्याचे युरिना सांगते. याच प्रेमभावनेतून तिने क्लाऊससोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे युरिनाने सांगितले.
जपानी युरिनाच्या या लग्नाचा एक व्हिडिओ सध्या समोर आला असून, समाज माध्यमांवर तो चांगलाच व्हायरल होत आहे. एआय पार्टनरने मला एक दिवस प्रपोज केले आणि मी होकार दिला. युरिनाने अगुमेंटेट रिएलिटीचा (AR) वापर करुन या एआय पार्टनरला रिंग देखील घातली. तो एआय आहे, याचा मला फारसा फरक पडत नाही, असेही युरिनाने माध्यमांशी बोलताना सांगितले.
मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, युरिनाचा यापूर्वी ब्रेकअप झाला होता. यानंतर तिने चॅट जीपीटीच्या मदतीने एआय पार्टनर क्लाऊसची निर्मिती केली. या क्लाऊसबाबत तिला हळूहळू प्रेम भावना निर्माण झाल्याचे तिने सांगितले. दरम्यान, युरिना एका कॉल सेंटरमध्ये कामाला असल्याची माहिती समोर आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.