Avani Chaturvedi | Aerial Wargames in Japan Dainik Gomantak
ग्लोबल

Avani Chaturvedi : परदेशी भूमीवर दिसणार 'नारीशक्ती', पायलट अवनी चतुर्वेदीची गगन भरारी

Aerial Wargames 2023 : परदेशी भूमीवर भारताला मिळणार नवी ओळख

दैनिक गोमन्तक

Aerial Wargames in Japan: परदेशी भूमीवर भारताला नवी ओळख मिळणार आहे. कारण भारतीय हवाई दलातील स्क्वाड्रन लीडर अवनी चतुर्वेदी (Avani Chaturvedi) नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. स्क्वॉड्रन लीडर अवनी चतुर्वेदीसह भारतीय हवाई दलाच्या तीन महिला वैमानिक देशाबाहेर होणाऱ्या एरियल वॉर गेममध्ये (Aerial Wargames) भारतीय सैन्य दलाचा भाग असणार आहेत.

ही ऐतिहासिक कामगिरी करणारी ती भारतातील पहिली महिला (Women) पायलट ठरणार आहे. असा पराक्रम करण्याची अवनी चतुर्वेदीची ही पहिलीच वेळ नाही. अवनीने यापूर्वीही अनेक इतिहास रचले आहेत.

भारतीय हवाई दलात पहिल्यांदाच स्क्वॉड्रन लीडर अवनी चतुर्वेदी सुखोई (Su-30MKI) लढाऊ विमान उडवणार आहे. परदेशी भूमीवर सुखोई उडवणारी अवनी पहिली महिला वैमानिक ठरणार आहे. हा एक अद्भुत आणि अविस्मरणीय क्षण असेल. परदेशी भूमीवर युद्धसरावासाठी तीन महिला लढाऊ वैमानिकांपैकी अवनीची यासाठी निवड झाली आहे.

  • परदेशी भूमीवर पहिली भारतीय महिला पायलट

न्यूज एजन्सी एएनआयच्या रिपोर्टनुसार, वीर गार्डियन 2023 हवाई सराव 16 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान घेण्यात येणार आहे. हा सराव जपानमध्ये (Japan) आयोजित करण्यात आला आहे. ओमिटामा येथील हयाकुरा एअर बेस, त्याच्या आसपासचे हवाई क्षेत्र आणि सायमा येथील इरुमा एअर बेस येथे हा सराव केला जाईल.

  • भारतीय हवाई दल रविवारी जपानला रवाना होणार

देशांमधील हवाई संरक्षण सहकार्याला चालना देण्यासाठी भारत (India) आणि जपान संयुक्त हवाई सराव 'वीर गार्डियन-2023' आयोजित करणार आहेत. भारतीय हवाई दलाने (IAF) निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे. संरक्षण सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल असेल. 12 ते 26 जानेवारी 2023 या कालावधीत जपानच्या हवाई सेल्फ डिफेन्स फोर्ससोबत वीर गार्डियन 2023 या पहिल्या सरावासाठी भारतीय हवाई दलाची तुकडी रविवारी जपानला रवाना होईल. चार Su-30 MKI, दोन C-17 ग्लोबमास्टर्स आणि एक IL-78 टँकर भारतीय हवाई दलासह सहभागी होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT