Iran Missile Attack Dainik Gomantak
ग्लोबल

Iran Missile Attack: अमेरिकन सैनिकांवरील हल्ल्यात चीनचा हात? गुप्तचर सॅटेलाईट फोटोंचा नवा खुलासा, ट्रम्प सरकारची वाढली डोकेदुखी

China Satellite Images Iran Missile Strike: जॉर्डनमधील अमेरिकेच्या अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या लष्करी तळावर नुकत्याच झालेल्या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्याने जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली.

Manish Jadhav

China Satellite Images Iran Missile Strike: जॉर्डनमधील अमेरिकेच्या अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या लष्करी तळावर नुकत्याच झालेल्या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्याने जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली. या प्राणघातक हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिकांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर अमेरिकन अधिकाऱ्यांनी केलेल्या सखोल तपासात अत्यंत धक्कादायक बाब समोर आली असून, या हल्ल्यामागे चीनची संशयास्पद भूमिका असल्याचा दावा 'वॉल स्ट्रीट जर्नल'च्या ताज्या अहवालात करण्यात आला.

इराणने (Iran) ज्या अचूकतेने जॉर्डनच्या मुवाफ्फक अल-सलती एअर बेसला लक्ष्य केले, त्यासाठी लागणारे हाय-रिझोल्यूशन सॅटेलाईट फोटो चीनच्या माध्यमातून इराणपर्यंत पोहोचल्याचा गंभीर संशय अमेरिकन प्रशासनाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 17 जुलै रोजी उत्तर-पूर्वी जॉर्डनमधील मुवाफ्फक अल-सलती एअर बेसवर 24 तासांच्या आत तीन वेळा शक्तिशाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. ज्या भागात अमेरिकन सैनिक वास्तव्यास होते, तसेच जिथे आधुनिक ड्रोन आणि लढाऊ विमाने उभी होती, नेमक्या त्याच भागांना या क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले. हल्ल्याच्या आधीची आणि हल्ल्यानंतरची लष्करी तळाची अचूक छायाचित्रे इराणला चीनमधील कंपन्यांद्वारे पुरवण्यात आल्याची भक्कम माहिती अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या हाती लागली. एप्रिलमधील युद्धविरामानंतर अमेरिकन सैनिकांचा बळी घेणारा हा पहिलाच मोठा हल्ला ठरला, ज्यामुळे संपूर्ण मध्य पूर्वेतील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

या घटनेमुळे वॉशिंग्टन आणि बीजिंग यांच्यातील आधीच ताणलेले राजनैतिक संबंध आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत. ट्रम्प प्रशासन गेल्या काही महिन्यांपासून चीनला सातत्याने इशारा देत होते की, त्यांच्या काही खाजगी कंपन्या इराणला संवेदनशील लष्करी डेटा पाठवत आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यातील प्रस्तावित शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर हा खुलासा समोर आल्याने चिंतेत भर पडली. अमेरिकेने चीनवर थेट अधिकृत आरोप केला नसला तरी, वॉशिंग्टनने या छायाचित्रांबाबत चिनी अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

दुसरीकडे, चीनने अमेरिकेचे सर्व आरोप फेटाळून लावत या दाव्यांचे पुरावे सादर करण्याची मागणी केली. आपल्या कोणत्याही कंपन्या अशा कारवायांमध्ये सहभागी नसल्याचा दावा चिनी परराष्ट्र मंत्रालयाने केला. मात्र, इराणची वाढती क्षेपणास्त्र क्षमता आणि त्यांना मिळणारी सॅटेलाईट मदत यामुळे अमेरिकेची सुरक्षा चिंता कमालीची वाढली असून, आगामी काळात दोन महासत्तांमधील तणाव अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT