Vivek Ramaswamy Dainik Gomantak
ग्लोबल

US President Election: 'मी राष्ट्राध्यक्ष झालो तर 75 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकेन', या नेत्याच्या वक्तव्याने अमेरिकेच्या राजकारणात खळबळ

Who is Vivek Ramaswamy: राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होण्याच्या शर्यतीत असलेले भारतीय-अमेरिकन विवेक रामास्वामी यांनी मोठी घोषणा केली आहे.

Manish Jadhav

US President Election: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची घोडदौड सुरु झाली आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होण्याच्या शर्यतीत असलेले भारतीय-अमेरिकन विवेक रामास्वामी यांनी मोठी घोषणा केली आहे.

रामास्वामी म्हणाले की, 2024 च्या निवडणुकीत ते जिंकले तर ते फेडरल सरकारच्या 75 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकतील आणि FBI सारख्या अनेक महत्त्वाच्या एजन्सी बंद करतील.

अमेरिकन न्यूज वेबसाइट 'Axios' ला दिलेल्या मुलाखतीत रामास्वामी म्हणाले की, त्यांच्या निशाण्यावर शिक्षण विभाग, FBI, उत्पादन शुल्क, तंबाखू, शस्त्रास्त्र आणि एक्सप्लोसिव्ज ब्युरो, परमाणु नियामक आयोग, IRS आणि वाणिज्य विभाग आहेत.

'पहिल्या दिवसापासून कामाला सुरुवात करणार'

"आम्ही पहिल्या दिवसापासून कामाला सुरुवात करु आणि आम्हाला पहिल्या वर्षाच्या अखेरीस कर्मचाऱ्यांची संख्या 50 टक्क्यांनी कमी करायची आहे," असे रामास्वामी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, येत्या पाच वर्षांत यातील 30 टक्के कर्मचारी (Employees) निवृत्तीचे वय गाठतील, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे ते न्याय्य आहे. यात शंका नाही. पण ते वाटतं तितकं सोपं नाही.

'Axios'च्या वृत्तानुसार, रामास्वामी म्हणाले की, चार वर्षांत 22 लाख कर्मचाऱ्यांपैकी 75 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

16 लाखांहून अधिक लोक बेरोजगार होणार!

'न्यूयॉर्क टाइम्स'नुसार, सुमारे 22 लाख 50 हजार लोक फेडरल सरकारमध्ये (Government) काम करतात. 75 टक्‍क्‍यांहून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकणे म्हणजे 1.6 दशलक्षाहून अधिक लोक काढून टाकले जातील.

ज्यामुळे फेडरल बजेटमध्ये अब्जावधी डॉलर्सची बचत होईल. मात्र, यामुळे शासनाची महत्त्वाची कामेही ठप्प होणार आहेत.

दुसरीकडे, रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणारे रामास्वामी यांच्यासह दोन उमेदवार भारतीय वंशाचे आहेत. दुसरे नाव निक्की हेली आहे. 21 फेब्रुवारी रोजी, फॉक्स न्यूज शोमध्ये, विवेक रामास्वामी यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीसाठी आपला दावा मांडला.

विवेक रामास्वामी हे 37 वर्षांचे असून त्यांचा जन्म ओहायो येथे झाला. येल आणि हार्वर्ड विद्यापीठात शिकलेल्या रामास्वामी यांनी जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भरपूर पैसा कमावला. त्यानंतर त्यांनी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी स्थापन केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT