donald trump and mojtaba khamenei Dainik Gomantak
ग्लोबल

US Iran Tension: इराणचा अमेरिकेला अल्टिमेटम! 5 अटी मान्य करा तरच चर्चा, अण्वस्त्रांच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं; युद्धाच्या छायेत जगाचा श्वास रोखला

Iran Five Demands For Talk: अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाहीये. दोन्ही देशांमध्ये कोणताही ठोस करार होऊ शकत नसल्याने तणाव कायम आहे.

Manish Jadhav

Iran Five Demands For Talk: अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाहीये. दोन्ही देशांमध्ये कोणताही ठोस करार होऊ शकत नसल्याने तणाव कायम आहे. सीजफायरची चर्चा होत असली, तरी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर अधूनमधून हल्ले सुरुच आहेत. अशातच, इराणने अमेरिकेसोबत होणाऱ्या संभाव्य दुसऱ्या फेरीच्या चर्चेपूर्वी अत्यंत कडक अटी घातल्या आहेत. इराणच्या 'फार्स न्यूज एजन्सी'ने दिलेल्या वृत्तानुसार, जोपर्यंत त्यांच्या पाच प्रमुख मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत, तोपर्यंत इराण कोणत्याही नवीन चर्चेत सहभागी होणार नाही, अशी भूमिका इराण सरकारने घेतली.

इराणने मांडलेल्या या पाच अटींमध्ये प्रामुख्याने प्रादेशिक युद्धांचा अंत, विशेषतः लेबनॉनमधील संघर्ष थांबवण्याचा समावेश आहे. याशिवाय, इराणवर लादलेले सर्व आर्थिक निर्बंध तातडीने हटवावेत, परदेशात गोठवलेले इराणचे अब्जावधी डॉलर्स मुक्त करावेत, युद्धात झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई द्यावी आणि होर्मुझच्या समुद्रधुनीवर (Strait of Hormuz) इराणच्या नियंत्रणाला आंतरराष्ट्रीय मान्यता द्यावी, अशा मागण्या इराणने केल्या आहेत.

इराणचे (Iran) म्हणणे आहे की, या अटींची पूर्तता करणे हा नवीन चर्चेपूर्वी विश्वास निर्माण करण्यासाठीचा किमान टप्पा आहे आणि त्याशिवाय संवादाला कोणताही आधार उरत नाही. इराण या मागण्या दीर्घकाळापासून करत असला तरी, अमेरिकेने त्या पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत.

दुसरीकडे, अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या तीन दिवसांच्या चीन दौऱ्यावर रवाना झाले आहेत. प्रवासाला निघण्यापूर्वी पत्रकारांनी त्यांना युद्धामुळे वाढणारी महागाई आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांबद्दल विचारले असता, ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक उत्तर दिले. "मी अमेरिकन अर्थव्यवस्थेचा विचारच करत नाही," असे धक्कादायक विधान त्यांनी केले.

ट्रम्प पुढे म्हणाले की, त्यांचा सध्याचा एकमेव उद्देश हा इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे बनवण्यापासून रोखणे हाच आहे. जे लोक या धोक्याचा विचार करत नाहीत ते "मूर्ख" आहेत, अशा कडक शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ट्रम्प यांच्या या विधानामुळे येणाऱ्या काळात अमेरिका इराणवर अधिक कडक कारवाई करण्याची शक्यता निर्माण झाली असून जागतिक राजकारणात खळबळ उडाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Surya Gochar 2026: राहूच्या नक्षत्रात ग्रहांचा राजा! सूर्याच्या गोचरमुळे 'या' 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस; आयुष्यात येणार सुखाचे दिवस

School Committee: फोंडा हेडगेवार विद्यालयात पालक-शिक्षक संघाची निवड

China Taiwan Tension: चीननं तैवानला घेरलं! समुद्रात युद्धनौका अन् आकाशात फायटर जेट्स; युद्ध पेटणार?

British PM Resigns: ब्रिटनमध्ये मोठी राजकीय उलथापालथ! पंतप्रधान कीर स्टारमर यांनी केली राजीनाम्याची घोषणा; काय घडलं अचानक?

LIVE मॅचदरम्यान आकाशातून वीज कोसळली, एका खेळाडूचा जागीच मृत्यू; अनेकजण जखमी

SCROLL FOR NEXT