US Defense Department's big claim, China is building military bases around the world

 

Dainik Gomantak

ग्लोबल

चिनी सैन्याबद्दल अमेरिकेचा मोठा गौप्यस्फोट, ड्रॅगन उभारतोय जगभरात लष्कर

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे की चीन (China) आपले नौदल, हवाई दल, लष्कराला मदत करण्यासाठी अतिरिक्त सुविधा देत आहे.

दैनिक गोमन्तक

चीन जगभरात आपले लष्करी तळ उभारत आहे किंवा तसे प्रयत्न करत आहे, असा दावा अमेरिकेच्या संरक्षण विभागाने केला आहे. आतापर्यंत केवळ एका लष्करी तळाची पुष्टी झाली आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे की चीन (China) आपले नौदल, हवाई दल, लष्कराला मदत करण्यासाठी अतिरिक्त सुविधा देत आहे. पेंटागॉनच्या (Pentagon) अधिका-यांनी सांगितले की चीन आपल्या सैन्याला पाठिंबा देण्यासाठी अतिरिक्त लष्करी तळ आणि रसद सुविधा पुरवण्याची योजना आखत आहे. पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ही जगातील सर्वात मोठी सेना आहे. पीएलएमध्ये सुमारे वीस लाख लष्करी कर्मचारी आहेत. शी जिनपिंग यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर चीनचे सैन्य अधिक आक्रमक झाले आहे. त्याचबरोबर त्याच्या महत्त्वाकांक्षाही वाढल्या आहेत.

अलीकडील मीडिया अहवालांनी संभाव्य चिनी लष्करी तळांसाठी इक्वेटोरियल गिनी आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) वर लक्ष केंद्रित केले आहे. डिसेंबरच्या सुरूवातीस प्रसारमाध्यमांनी सांगितले की चीन इक्वेटोरियल गिनीमध्ये आपला पहिला लष्करी तळ बांधण्याचा प्रयत्न करत आहे. बाटा या चिनी बनावटीच्या व्यावसायिक बंदरात लष्करी तळ उभारण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.

अमेरिकन (US) सैन्याच्या आफ्रिका कमांडचे कमांडर जनरल स्टीफन टाउनसेंड यांनी एप्रिलमध्ये सांगितले होते की चीनकडून सर्वात मोठा धोका आफ्रिकेच्या अटलांटिक किनारपट्टीवरील नौदल सुविधांपासून येईल. ते म्हणाले होते, "मी एका बंदराबद्दल बोलतोय जिथे ते शस्त्रांनी पुन्हा हल्ला करू शकतात आणि नौदलाच्या जहाजांची दुरुस्ती करू शकतात."

यापूर्वी, अबू धाबीच्या उत्तरेस 80 किमी अंतरावर असलेल्या खलिफा या मालवाहू बंदरातील बांधकामाचे काम अमेरिकेकडून इशारे मिळाल्यानंतर थांबवावे लागले होते. यूएईला न कळवता तेथे गुप्तपणे लष्करी तळ उभारल्याचा आरोप चीनवर होता. 2018 मध्ये, COSCO शिपिंग पोर्ट अबू धाबी टर्मिनल अपग्रेड करण्यासाठी UAE आणि चीन यांच्यात एक करार झाला. हे बंदर अल डफ्रा एअर बेस आणि जेबेल अली या दोन्हींजवळ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Accident: नियंत्रण सुटलं अन् घात झाला! मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Surya Gochar 2026: राहूच्या नक्षत्रात ग्रहांचा राजा! सूर्याच्या गोचरमुळे 'या' 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस; आयुष्यात येणार सुखाचे दिवस

School Committee: फोंडा हेडगेवार विद्यालयात पालक-शिक्षक संघाची निवड

China Taiwan Tension: चीननं तैवानला घेरलं! समुद्रात युद्धनौका अन् आकाशात फायटर जेट्स; युद्ध पेटणार?

British PM Resigns: ब्रिटनमध्ये मोठी राजकीय उलथापालथ! पंतप्रधान कीर स्टारमर यांनी केली राजीनाम्याची घोषणा; काय घडलं अचानक?

SCROLL FOR NEXT