US Flag Dainik Gomantak
ग्लोबल

कॅलिफोर्नियाने मंजूर केले जातिभेद विरोधी विधेयक, असे करणारे ठरले पहिले राज्य

Anti Caste Discrimination Bill California: हे विधेयक सोमवारी असेंब्लीमध्ये मंजूर करण्यात आले, त्यानंतर ते राज्याचे राज्यपाल गेविन न्यूजम यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले.

Manish Jadhav

Anti Caste Discrimination Bill California: यूएस मध्ये, 'कॅलिफोर्निया स्टेट असेंब्ली' ने जातिभेद विरोधी विधेयक मंजूर केले आहे, जे राज्यातील जातीय भेदभाव दूर करण्याबद्दल आणि उपेक्षित समुदायांचे संरक्षण करण्याबाबत सांगते.

हे विधेयक सोमवारी असेंब्लीमध्ये मंजूर करण्यात आले, त्यानंतर ते राज्याचे राज्यपाल गेविन न्यूजम यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले. गव्हर्नरच्या स्वाक्षरीनंतर, या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल.

यासह, कॅलिफोर्निया (California) हा अमेरिकेतील भेदभावविरोधी कायद्यांमध्ये संरक्षित श्रेणी म्हणून वंशाचा समावेश करणारे पहिले राज्य बनेल.

विधेयकाचा उद्देश

राज्यातील जाती-आधारित भेदभाव दूर करणे आणि उपेक्षित समुदायांचे संरक्षण करणे हे या विधेयकाचे उद्दिष्ट आहे. हे विधेयक राज्य सिनेटर आयेशा वहाब यांनी सादर केले होते आणि देशातील अनेक वांशिक समानता नागरी हक्क कार्यकर्ते आणि संघटनांनी त्याला पाठिंबा दिला होता.

विधेयक मंजूर केल्याबद्दल वहाब यांनी आभार मानले

हे विधेयक मंजूर केल्याबद्दल वहाब यांनी असेंब्लीचे आभार मानले. आज SB 403 च्या समर्थनार्थ मतदान करणाऱ्या सर्व सदस्यांचे आभार. धन्यवाद...

उत्तर अमेरिकेतील हिंदूंनी या विधेयकाला विरोध केला आहे

'हिंदू ऑफ नॉर्थ अमेरिका' (COHNA) ने कॅलिफोर्नियाच्या इतिहासातील 'काळा दिवस' असे वर्णन केले आहे. COHNA ने एका निवेदनात म्हटले आहे की, हिंदू अमेरिकन लोकांना लक्ष्य करण्यासाठी डिझाइन केलेले हे विधेयक 'एशियन इक्सक्लूजन एक्ट सारख्या अन्यायकारक कायद्याप्रमाणेच सिद्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT