Amit Shah S. Jaishankar Threatened by Khalistani Dainik Gomantak
ग्लोबल

Amit Shah S. Jaishankar Threatened by Khalistani: अमित शाह आणि एस जयशंकर यांना धमकी, खलिस्तानी दहशतवादी पन्नूकडून 1.25 लाख डॉलरचे बक्षीस जाहीर

शीख फॉर जस्टिस या दहशतवादी संघटनेचे प्रमुख आणि खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे.

Manish Jadhav

Khalistani Pannu Issue Open Threat To Amit Shah: शीख फॉर जस्टिस या दहशतवादी संघटनेचे प्रमुख आणि खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे.

गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि कॅनडातील उच्चायुक्त संजय वर्मा यांच्या परदेश दौऱ्याबाबत माहिती देणाऱ्याला 1,25,000 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस देण्याची घोषणा पन्नूने पोस्टरद्वारे दिली आहे. म्हणजेच अमित शाह, एस जयशंकर आणि संजय वर्मा यांना दहशतवाद्यांनी उघडपणे धमकी दिली आहे.

दरम्यान, पन्नूने अमित शाह (Amit Shah), एस जयशंकर आणि संजय वर्मा यांच्यावर कॅनडात मारला गेलेला दहशतवादी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. एनआयएच्या वाँटेड यादीत पन्नूचा समावेश आहे.

बेकायदेशीर प्रतिबंध कायद्यांतर्गत त्याला वाँटेड घोषित करण्यात आले आहे. पन्नूकडे यूएस आणि कॅनडाचे पासपोर्ट आहेत. निज्जरच्या हत्येसाठी वरील लोकांना आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत जबाबदार धरण्याची धमकी त्याने दिली.

दुसरीकडे, कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतात हरदीपसिंग निज्जरची हत्या करण्यात आली होती. यानंतर शीख फुटीरतावादी भारत सरकारविरुद्ध गरळ ओकत आहेत. निज्जरच्या हत्येनंतर टोरंटो, लंडन, मेलबर्न आणि सॅन फ्रान्सिस्कोसह अनेक शहरांमध्ये खलिस्तान समर्थकांनी निदर्शने केली.

यावेळी खलिस्तानी समर्थकांनी भारत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. खलिस्तानी संघटना SFJ ने कॅनडास्थित (Canada) शीख कट्टरवाद्यांना 15 ऑगस्ट रोजी ओटावा, टोरंटो आणि व्हँकुव्हरमधील भारतीय राजनैतिक संकुलांना घेराव घालण्याचे आवाहन केले आहे. 10 सप्टेंबर रोजी व्हँकुव्हरमध्ये तथाकथित शीख सार्वमताची घोषणा केली आहे.

तसेच, कॅनडातील भारतीय राजनयिक अधिकाऱ्यांनी अमित शाह, एस जयशंकर आणि संजय वर्मा यांच्या डोक्यावरील इनामाबद्दल गुप्तचर संस्था आणि स्थानिक पोलिस यंत्रणेला आधीच माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT